रत्नागिरी जिल्ह्यातील जलशक्ती अभियानांअतर्गत कामांचा आढावा..

Spread the love

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हयातील जलशक्ती अभियानांअतर्गत कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे आरती सिंग परिहार, Director, Automic Energy यांनी घेतला. मृद व जलसंधारण विभागाचे सुहास गायकवाड यांनी संगणक सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, टेक्नीकल अधिकारी श्री. नाईक प्रांतधिकारी विकास सुर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) एम.बी. बोरकर आदि संबधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हयामध्ये जलशक्ती अभियानांतर्गत सुरु असलेल्या कामांबाबत आरती सिंग परिहार, Director, Automic Energy यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानात सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. गावातील, शहरातील प्रत्येकाला पाण्याचे महत्व समजून घेणे फार गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये अधिक जाणीव जागृती करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जलशक्ती अभियानाची जिल्हयात प्रभावी अमलंबजावणी करण्यात येत असून याबाबत संबधित विभागाकडून वारंवार आढावा घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी जि.प. च्या विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग, नगरपालिका प्रशासन आदि विभागांनी आपल्या विभागाची या अभियाना अनुषगांने माहिती दिली. फळबाग लागवड, वृक्ष लागवड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन सिंचन विहिरी, अमृत सरोवर, शोषखड्डे सार्वजनिक व वैयक्तिक, सिमेंट नालाबांध, बंधारे आदिबाबतची माहिती यावेळी देण्यात आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page