
ठाणे; (निलेश घाग)मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीच्या दिवा शहर मंडळामार्फत शहरातील निवृत्त सैनिकांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .
भारतीय जनता पार्टी दिवा शहर मंडळच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले अभियान मेरी माटी मेरा देश हेअभियान राबविण्यात आले.या अंतर्गत दिवा शहरातील स्वतंत्र सेनानी, शूर जवान ज्यांनी आपल्या देशाचं संरक्षण व्हाव यासाठी दिवस-रात्र सीमेवर अहो रात्र उभे राहून आपली सेवा देशाला अर्पण केली,अशा निवृत्त शूर जवानांचा सन्मान करण्यात आला. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, यांच्या नेतृत्वात दिवा मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे, सरचिटणीस युवराज यादव, ठाणे शहर जिल्हा उत्तर भारतीय उपाध्यक्ष अमरनाथ गुप्ता यांच्या हस्ते निवृत्त जवानांना तिरंगा झेंडा व भारत मातेची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.
जाहिरात
