ठाणे : दिवा शहरातील समाधान नगर परिसरातील नागरिकांना गेले दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नव्हता.याबद्दल वारंवार पाठपुरावा करूनही ठा.महापालिका प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने, मनसे दिवा शहर च्या पदाधिकाऱ्यांनी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन दोन दिवसात समाधान नगरचा पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास आयुक्तांच्या दालनासमोर बसून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिवा मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी दिला होता.
दिवा शहर मनसेच्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर कामाला सुरुवात करून नवीन पाण्याच्या सबलाईनचे काम पूर्ण करून आज पासून सर्व नागरिकांना नवीन नळ जोडण्या जोडून देण्यास सुरुवात केली. दिलेल्या वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल दिवा शहर मनसेने ठा.महापालिका अधिकाऱ्यांचे देखील आभार
मानले आहेत.