गणेशोत्सवासाठी कोंकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाड्या; येत्या २३ व २४ जुलै रोजी आरक्षण सुरु होणार….

Spread the love

सर्व विशेष गाड्याना संगमेश्वर थांबा….

मुंबई : दि १८ जुलै- दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने मुंबईस्थित कोकणवासियांनी कोकणातील गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने कोकणवासियांना एसटी किंवा खासगी बसचा पर्याय स्वीकाराला लागत आहे. परिणामी, जादा पैसे आणि अधिक वेळ यात वाया जातो. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी २५० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.

यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरू होत असून गणेशोत्सवाला एका महिना उरला आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी मुंबईस्थित कोकणवासियांची लगबग सुरू आहे. परंतु, एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रवासी कोकणात जात असल्यामुळे प्रचंड गर्दी होते. त्यामुळे प्रवासादरम्यान असुविधा होते. ही गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर २५० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी दैनिक विशेष रेल्वेगाडी (४० फेऱ्या)

* गाडी क्रमांक ०११५१ विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता पोहोचेल.

* गाडी क्रमांक ०११५२ विशेष रेल्वेगाडी सावंतवाडी रोड येथून २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३.३५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल.

*सीएसएमटी – रत्नागिरी- सीएसएमटी दैनिक विशेष रेल्वेगाडी (३६ फेऱ्या)*

* गाडी क्रमांक ०११५३ विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत दररोज सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी रात्री ८.१० वाजता पोहोचेल.

* गाडी क्रमांक ०११५४ विशेष रेल्वेगाडी रत्नागिरी येथून २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल.

सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी दैनिक विशेष रेल्वेगाडी (३६ फेऱ्या)

* गाडी क्रमांक ०११०३ विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पोहोचेल.

* गाडी क्रमांक ०११०४ विशेष रेल्वेगाडी सावंतवाडी रोड येथून २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत दररोज पहाटे ४.३५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता पोहोचेल.

२४ जुलैपासून आरक्षण सुरू

गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण २४ जुलै रोजीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होईल. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट आरक्षण अनारक्षित तिकीट प्रणालीद्वारे (यूटीएस) अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार करता येईल.

मुंबई, पुण्यावरून जाणाऱ्या एकूण १३८ विशेष रेल्वेगाड्या खालीलप्रमाणे…

* दिवा – चिपळूण मेमूच्या ३८ फेऱ्या धावतील.

* लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड दैनिक विशेष रेल्वेगाडीच्या ७२ फेऱ्या धावतील.

* लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ६ फेऱ्या धावतील.

* लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या धावतील.

* लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव वातानुकूलित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ६ फेऱ्या धावतील.

* पुणे – रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ६ फेऱ्या धावतील.

* पुणे – रत्नागिरी वातानुकुलित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ६ फेऱ्या धावतील.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page