रायगड ,22 जुलै – रायगड येथील इर्शाळवाडी बुधवारी रात्री दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक जणांना बाहेर काढण्यात आले आहे. तर अद्याप काही नागरिक बेपत्ता आहेत. ते दरडीखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आज सकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एनडीआरएफने शोधकार्य थांबवले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या गावात वीज नाही. एनडीआरएफच्या जवानाने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली जाणार आहे.
या घटनेत अनाथ झालेल्या २२ मुलांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदे फाऊंडेशन पुढे आले आहे. या घटनेत अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वीकारले आहे.