🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 रत्नागिरी | जानेवारी २९, २०२३.
▪️ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स फॉर वुमनमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
▪️ महाविद्यालयाच्या पटांगणावर भारतमातेचे पूजन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाने विद्यार्थिनींच्या व्यक्तिगत गुण, कला कौशल्य विकास व सामाजिक विषयांची जाणीव होण्यासाठी ई-पोस्टर व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. ई-पोस्टरसाठी मेक इन इंडिया व वक्तृत्व स्पर्धेसाठी जी-२० समिट हा विषय देण्यात आला होता. यात प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष बीसीएच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
▪️ ई-पोस्टर स्पर्धेत प्रथम लक्ष्मी कोचरे (द्वितीय वर्ष बीसीए), द्वितीय प्रगती बंडबे (द्वितीय वर्ष बीसीए), तृतीय आदिती साळवी (द्वितीय वर्ष बीसीए) यांनी यश मिळवले. तसेच वक्तृत्व स्पर्धेत प्रथम प्रीती साळवी (द्वितीय वर्ष बीसीए), द्वितीय माहीन मुल्ला (तृतीय वर्ष बीसीए) आणि तृतीय क्रमांक ईशा चव्हाण (प्रथम वर्ष बीसीए) हिने मिळवला. या दिमाखदार सोहळ्यासाठी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी प्रकल्पाचे प्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रकल्प समन्वयक स्वप्निल सावंत, स्थानीय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश सोहनी, डॉ. राजीव सप्रे , प्रसन्न दामले, आनंद पंडित, दीपक जोशी, आदिती देसाई, शिल्पा पानवलकर, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अजित पठाण, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.