✍🏻 संतोष पोटफोडे / साखरपा…
▪️संगमेश्वर तालुक्यातील मेघी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेघी बौद्धवाडी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांचे रक्त गट तपासणी शिबीर घेण्यात आले.
▪️या उपक्रमात मेघी शाळा नं. १ मेघी बौद्धवाडी शाळा अंगणवाडी यामधील मुले शिबिरात सहभागी झाली. शाळेचे मुख्याध्यापक सचिन सकपाळ यांचे बंधू डॉ. राहुल यशवंत सकपाळ एम बी बीएस एम डी ,एम डी पॅथोलॉजी शिवाजी चौक देवरुख यांच्या सौजन्याने हे शिबीर घेण्यात आले होते.
▪️तर या शिबिराचे आयोजन मेघी बौद्धवाडी शाळेने केले. लॅब टेक्निशियन स्नेहा पाले व विनीत घाणेकर यांनी रक्तगट तपासणी केली.
▪️यावेळ हस्ताक्षर स्पर्धा, फनी गेम्स, हळदी कुंकू अशा दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
💐 पंचक्रोशीत असा भरगच्च कार्यक्रम घेणाऱ्या मेघी बौद्धवाडी शाळेचे कौतुक करण्यात येत आहे.
▪️यावेळी देवळे केंद्रीय प्रमुख अनंत शेडे सरपंच शीतल हेगिष्टे उपसरपंच गंगाराम केसरकर माजी सरपंच रत्नाकर बेटकर प्रमिल चव्हाण शाळा व्यवस्थापन समिती अद्यक्षा पायल बेटकर उपअद्यक्ष मंगेश चव्हाण मेघी शाळा नं १ मुख्याद्यापकभरत बेटकर शिक्षक संजय जाधव सुधाकर जाधव ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश दळवी प्रमिला कांबळे करंबेळे भुवड आदी मान्यवर उपस्थित होते तर शाळेला आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत करणारे संजय जाधव दिनेश करंबळे शैलेश बेटकर सागर कांबळे रवी कांबळे चंद्रकांत बेटकर अनंत जाधव यांनी मदत करून मोठे योगदान केले या सर्वांचे मुख्याद्यापक सचिन सकपाळ व सूर्यवंशी सर यांनी सर्वांचे कौतुक करून उपक्रम यशस्वी केल्या बद्दल विद्यार्थी ग्रामस्थ पालक सर्व शिक्षक वृंद यांना धन्यवाद दिले.