
चिपळूण शहरातील रस्त्यांवरची अतिक्रमणे हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा
चिपळूण : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी चिपळूण नगर पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणार्या अतिक्रमणविरोधात आक्रमक पाऊल उचलत मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच अनुषंगाने हातागाडीधारक व व्यावसायिकांना आपापली अतिक्रमणे येत्या आठ दिवसात हटविण्याच्या सूचना वजा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील बहादूरशेख नाका ते मच्छी मार्केट व चिंचनाका ते पाग पॉवर हाऊस या नगर पालिकेच्या मुख्य रस्त्यावर तसेच पानगल्ली व अन्य बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणी हातगाडीधारक व अन्य व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.
जाहिरात :

