जनशक्तीचा दबाव न्यूज | नवी दिल्ली | मे ०३, २०२३.
महागाईने ग्रासलेल्या सर्वसामान्यांसाठी काहिसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारणही तसच आहे. आता खाद्यतेलाच्या किंमतीत 6 टक्के घट होण्याची शक्यता आहे. खाद्यतेल कंपन्यांनी (Edible oil companies) केंद्र सरकारच्या (Central Govt) सूचनेनंतर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये 6 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात (International markets) वस्तुंच्या किंमतीत घसरण झाली आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवर खाद्यतेलाच्या किंमतीत बदल करण्याची गरज असल्याचे सरकारचे मत आहे. फॉर्चून ब्रँन्डचे (Fortune Brand) मालक अदानी विल्मार (Adani Wilmar) व जेमिनी ब्रँन्डचे (Gemini Brand) मालक जेमिनी एडिबल (Gemini Edible) आणि फॅट्स इंडिया यांनी अनुक्रमे 5 रुपये प्रति लिटर आणि 10 रुपये प्रति लिटरने किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये घट झाल्याचा फायदा येत्या तीन आठवड्यामध्ये पोहचेल असे म्हटले आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने (SEA) मंगळवारी एक निवेदन जारी करुन म्हटले आहे की, खाद्य आणि ग्राहक व्यवहार विभागाने एसईएला त्यांच्या सदस्यांना खाद्यतेलावरील MRP कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना फायदा देण्यासाठी सूचित करण्याचा सल्ला दिला आहे.
एसईएने सांगितले की, गेल्या सहा महिन्यांमध्ये प्रामुख्याने गेल्या दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये कच्च्या पामतेलाच्या किंमतीत घट झाली आहे. भूईमूग, सोयाबीन आणि मोहरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे, तरिही आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण झाली नाही. त्यामुळे सरकारकडून काद्यतेल कंपन्यांना अशा सूचना दिल्याची माहिती मिळत आहे.
ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार देशात 2 मे रोजी शेंगदाणा तेलाचा दर 189.95 रुपये प्रति लिटर, मोहरी तेल 151.26 रुपये प्रति लिटर, सोयाबीन तेल 137.38 रुपये प्रति लिटर, सूर्यफूल तेल 145.12 रुपये प्रति लिटर आहे. यामध्ये येत्या तीन आठवड्यामध्ये घट होणार आहे. त्यामुळे महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आता काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळणार आहे, हे मात्र नक्की!