त्वचेच्या आजाराने पीडित पिंकीला रहमान फाउंडेशनने दिला मायेचा हात, कळंब येथील घटना, पिंकीवर उपचार सुरू

Spread the love

नेरळ : सुमित क्षीरसागर

कर्जत तालुक्यातील कळंब येथे टेपाचीवाडीमधील पिंकी या मुलीला त्वचेचा आजार झाला होता. मात्र तो गंभीर काहीतरी असल्याचा सर्वांचा गैरसमज झाला होता. त्यामुळे एकट्या पडलेल्या या मुलीला रहमान फाउंडेशनचे देवदूत भेटले व त्यांनी दिलेल्या मायेच्या हातामध्ये पिंकिवर योग्य उपचार सुरू झाले आहेत. हल्ली अनेक आजार डोके वर काढत आहेत. मात्र त्यात त्या रुग्णाला गरज असते ती धीर आणि मायेची. मात्र आजाराला घाबरून घरचे देखील साथ सोडत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. कर्जत तालुक्यातील कळंब टेपाची वाडी येथे आदिवासी समाजाची पिंकी कातकरी वय १८ ही तिच्या मामाच्या घरी राहत होती. साधारण पिंकी १० वर्षांची असताना तिचे आईवडील आजारपणात गेले. त्यामुळे एकट्या पडलेल्या पिंकीला कळंब येथे तिचे मामा घेऊन आले व तिचा सांभाळ करू लागले. त्यांच्याकडे पिंकी मोठी होत होती.

मात्र मागील काही दिवसांपासून तिला त्वचेचा काहीतरी आजार झाला. मात्र तो गंभीर काहीतरी आहे असे सर्वांना वाटू लागले. तर यामुळे पिंकी एकटी पडली. ती अशीच आजूबाजूला कुठेही एकटी बसून दिवस काढू लागली. अशात दिनांक १० ऑक्टोबर रोजी एका फार्मच्या बाजूला बसलेली असताना पिंकी ही सादिक मुश्ताक बुबेरे या तरुणाला दिसली. त्याने तिची विचारपुस् केली असता हृदय पिळवटणारी माहिती समोर आली. त्यांनी लागलीच त्या मुलीच्या खाण्या पिण्याची सोय केली. तसेच आपल्या ओळखीच्या माणसांना हा प्रकार सांगितला. तेव्हा रहमान फाऊंडेशनचे अब्दुल माजिद व तरुण उद्योजक सर्फराज टिवाले ह्यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी तात्काळ आपले संस्थेचे कार्यकर्ते तरुण रईस अन्वर बुबेरे,अफझल अयुब डोंगरे, सादिक मुश्ताक बुबेरे व शहजाद शब्बीर लोगडे यांना मदतीसाठी पाठवले. मुलीच्या नातलगांशी देखील संपर्क केला गेला.

कळंब पोलीस दुरक्षेत्र येथील पोलिस अधिकारी सुनील शेंबडे यांना देखील सबंधित प्रकारची माहिती देऊन. कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात कळवण्यात आले. तेव्हा तत्काळ कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर निलेश यादव, दिनेश जोशी यांनी पिंकी असलेल्या ठिकाणी जाऊन तिची प्राथमिक तपासणी केली. त्यासह तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून तिच्यावर उपचार सुरू केले. पिंकीला फक्त त्वचेचा आजार आहे हा कोणताही संसर्गजन्य रोग नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तसेच पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ यांच्याशी देखील बोलणे केले. तर दुसऱ्या दिवशी रुग्णवाहिकेतून पिंकी हिला एमजीए कामोठे येथे नेण्यात आले. त्याची जबाबदारी कळंबच्या तरुणांनी घेतली असून खर्चाची जबाबदारी रहमान फाऊंडेशन व सर्फराज टिवाले ह्यांनि घेतली आहे. दरम्यान पिंकिवर आता एमजीएम रुग्णालयात योग्य ते उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर यासाठी लागणारी सर्व मदत रहमान फाऊंडेशनचे कार्यकर्ते यांनी तिथे थांबून केली आहे. तेव्हा पिंकी साठी रहमान फाऊंडेशनचे कार्यकर्ते हे देवदूत बनून आल्याने तिच्यावर योग्य उपचार सुरू झाले आहेत.

आम्हाला याबाबत समजल्यावर आम्ही मुलगी असलेल्या ठिकाणी जाऊन तिची चौकशी करत प्राथमिक तपासणी देखील केली. तसेच तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून तिच्यावर उपचार सुरू केले. तसेच या मुलीला त्वचेचा साधा आजार असल्याने तिच्या घरच्यांना त्याबद्दल कल्पना देऊन त्यांचे समुपदेशन देखील केले. तर पुढील उपचारासाठी तिला कामोठे येथे रुग्णालयात दखल केले आहे.
: डॉ. निलेश यादव, वैद्यकीय अधिकारी, कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र

आम्हाला या प्रकाराबाबत समजल्यावर आम्ही तत्काळ प्रशासनाशी संपर्क करत तिला मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले. रहमान फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक यांनी पिंकी हिला कळंब पासून कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत मदत केली तसेच पुढील उपचाराची जबाबदारी देखील संस्थेचे सर्फराज टिवाले यांनी घेतली आहे. ती पूर्ण बरी होईपर्यंत आम्ही पिंकी हिच्या सोबत आहोत.
: शहजाद लोगदे, स्वयंसेवक रहमान फाऊंडेशन नेरळ

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page