अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीला मुदतवाढ; आता ५ जूनपर्यंत करता येणार नोंदणी…

Spread the love

मुंबई- दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात 31 मे 2025 रोजी एक सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, राज्य शासनाने इन-हाऊस कोट्याच्या जागा भरण्याच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.

पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, विद्यार्थी नोंदणीसाठी 3 जून 2025 ही अंतिम तारीख होती. मात्र आता विद्यार्थ्यांना अधिक वेळ देत ही मुदत 5 जून 2025 रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे. नवीन निर्णयानुसार, खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा इन-हाऊस कोट्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. मुंबई शहर, उपनगर व ठाणे जिल्ह्यांत एका संस्थेची शाळा व कनिष्ठ/वरिष्ठ महाविद्यालय यांचा एक युनिट ग्राह्य धरला जाणार आहे. इतर जिल्ह्यांत महसूली जिल्हा हे इन-हाऊस कोट्यासाठी युनिट मानले जाईल.

महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न शाळांनी जर इन-हाऊस कोट्यांत बदल केल्यास, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमात सुधारणा करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. इन-हाऊस कोट्यामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक तसेच विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा याकरीता विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक 3 जून ऐवजी आता 5 जून 2025 रोजी दुपारी 2 पर्यंत करण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page