दिवा : ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरातील दिवा-शीळ रस्ता, दिवा-आगासन रस्ता, मुंब्रादेवी कॉलनी रस्ता, साबेगाव रस्ता अशा प्रमुख रस्त्यांवर जिथे शाळा, धार्मिक स्थळे, हॉस्पिटलं आहेत अशा ठिकाणी गतिरोधक उभारण्यासंदर्भ सन्माननीय आमदार राजू दादा पाटील यांनी दिवा प्रभाग समिती आणि वाहतूक विभाग यांच्याकडे मागणी केली होती, तसा लेखी पत्रव्यवहारही ठाणे महानगरपालिकिडे करण्यात आला होता.परंतु वाहतूक विभागाकडून परवानगी नसल्याचे कारण सांगून महापालिकेच्या अभियंत्यांकडून गतिरोधक बनविण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.
याच विषयावर चर्चा करण्यासाठी शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या सूचनेनुसार आज वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री.सुरेश खेडेकर यांची आज दिवा शहर मनसे पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन या विषयाचे गांभीर्य वाहतूक विभागाच्या लक्षात आणून दिले. यावेळी महापालिकेचे अभियंता श्री.अनिल पाटील आणि श्री सुरेश खेडेकर यांच्यात फोनवरून चर्चा होऊन लवकरच याबाबतच्या परवानगी पूर्ण करून गतिरोधकाचे काम सुरू करण्यास सांगण्यात आले. तसेच दिवा स्टेशन परिसरात किमान संध्याकाळी ६ ते ९ दरम्यान अनधिकृत फेरीवाल्यांनमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याचेही त्यांनी मान्य केले. यावेळी दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष शरद पाटील, विभाग सचिव परेश पाटील व विनोद वास्कर राष्ट्रीय मानव अधिकार अध्यक्ष ठाणे जिल्हा हे पदाधिकारी उपस्थित होते.