ठाणे: ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय (Rajiv Gandhi Medical College) च्या आस्थापनेवरील “परिचारीका” संवर्गातील 72 रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने सहा महिन्याच्या (179 दिवस) कालावधीसाठी भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दि. 29/08/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.
पद संख्या : 72
शैक्षणिक पात्रता : 1. महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (H.S.C) 2. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविका (जी.एन.एम.) 3. बी.एस्सी . (नर्सिंग) असल्यास प्राधान्य. 4. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. 5. शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील नर्स मिडवाईफ / परिचारिका / स्टाफ नर्स या कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव. 6. ठाणे महानगरपालिकेच्या अधिनस्त परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बी.एस्सी (नर्सिंग) पूर्ण केलेल्या उमेदवारांस प्राधान्य. 7. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
नोकरीचे ठिकाण : ठाणे
निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : 29 ऑगस्ट 2023
● मुलाखतीचा पत्ता : के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
अधिकृत वेबसाईट https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html
जाहिरात
जाहिरात