ISRO मध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास तरुणांनाही करता येणार अर्ज…

Spread the love

श्रीहरीकोटा- भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO मध्ये काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. अशा तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. ISRO संस्थेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये वैज्ञानिक/अभियंता, तंत्रज्ञ तांत्रिक सहाय्यक, ड्रायव्हर ही पदे भरण्यात येणार आहेत. सर्व पात्र उमेदवारांना ISRO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येईल. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख काय असेल जाणून घ्या.

अर्जाची अंतिम तारीख…

(ISRO)इस्रोत काम करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज भरताना अर्जात काही त्रुटी निघाल्यास किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. 12 फेब्रुवारी नंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता…

ISRO मध्ये वैज्ञानिक/अभियंता, तंत्रज्ञ तांत्रिक सहाय्यक, ड्रायव्हर ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आयटीआय/बीएससी/डिप्लोमा इन इंजिनिअरिंग/बीई/बीटेक/एमई/एमई/एमटेक/एमएससी यातील कोणतीही पदवी असणे आवश्यक आहे.

पगार किती मिळेल…

विविध पदांसाठी निवड करण्यात आल्यानंतर उमेदवारांना 65 हजार 554 रुपये ते 81 हजार 906 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल. परंतु इतर पदांसाठी पगार हा मुलाखतीनंतर निश्चित करण्यात येईल.

वयोमर्यादा काय?…

इस्रोत विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. 18 खालील किंवा 35 पेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करायचा?..

सर्वात प्रथम अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www.ursc.gov.in वर जावे. त्यानंतर करिअर सेक्शनवरली रिक्रूटमेंटवर यावर क्लिक करावे. पुढे Apply online येथे क्लिक करावे. तिथून पुढे अर्जासंबंधित देण्यात आलेली सर्व माहिती भरावी.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page