
मुंबई- एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून १७ हजार ४५० कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यात चालक आणि सहाय्यक अशा पदांसाठी भरती होणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
एसटी महामंडळाच्या ३०० व्या कंत्राटी बैठकीमध्ये राज्यासाठी हा महत्त्वाचा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून आता कंत्राटी पद्धतीने एसटीमध्ये नोकरीची संधी मिळाल्यानंतर पुढील ३ वर्ष हा करार असेल. ३ वर्षांसाठी ही एसटीतील कंत्राटी भरती असेल. एसटीकडून कंत्राटी भरतीसाठी निवड झालेल्या तरुण-तरुणींना एसटीकडून संपूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतरच त्यांना सहाय्यक आणि चालक या पदांसाठी रुजू केलं जाईल. एसटीतील कंत्राटी मनुष्यबळ भरतीसाठी येत्या २ ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या ई-निविदा प्रक्रियेसाठी सहा प्रादेशिक विभागनिहाय प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
या कंत्राटी पद्धतीत नोकरी मिळाल्यानंतर महिन्याला कमीत कमी ३० हजार रुपये वेतन मिळणार आहे. एसटीच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रभरातील अनेक बेरोजगारांना मोठी संधी आहे. १७ हजार ४५० तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ८ हजार नवीन बससाठी मनुष्यबाची आवश्यकता असते. अशात एसटी महामंडळात मोठी भरती होणार आहे. एसटी महामंडळात दरवर्षी जवळपास १००० च्या संख्येत इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. अशा एसटी सेवा सुरळित ठेवण्याची आवश्यकता आहे. अशात बसेसच्या देखभालीसाठी, तसंच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी चालक, सहाय्यक अशा मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळेच कंत्राटी पद्धतीने रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जात आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

