भारतीय गुप्तचर विभागात ३,७०० पदांसाठी भरती…

Spread the love

मुंबई l 22 जुलै- सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी चालून आली आहे. भारतीय गुप्तचर विभागामार्फत विविध पदांसाठी रिक्त असलेल्या पदांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीअंतर्ग असिस्टेंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणजेच सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO Post) ही पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ३ हजार ७१७ उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदावारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२५पर्यंत देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेतील एकूण ३ हजार ७१७ पदांपैकी १ हजार ५३७ पदे सामान्य श्रेणीसाठी, ४४२ पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, ९४६ पदे इतर मागासवर्गीयांसाठी, ५६६ पदे अनुसूचित जातींसाठी आणि २२६ पदे अनुसूचित जमातींसाठी आहेत. ही भरती विविध विभागांमध्ये विविध श्रेणींमध्ये ग्रेड II/कार्यकारी पदासाठी केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना गृह मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.mha.gov.in वर जाऊन अर्ज भरता येणार आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असावी. उमेदवारांना संगणकाचे मूलभूत ज्ञान देखील असले पाहिजे. उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांचे वय १० ऑगस्ट २०२५ च्या आधारावर मोजले जाईल. सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना अर्ज शुल्क ६५० रुपये भरावे लागेल. इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५५० रुपये आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page