जर तुम्हाला जीवनात तणावमुक्त रहायचे असेल, तर भगवान श्रीकृष्णाच्या या शिकवणींचा तुमच्या जीवनात समावेश करा. यामुळे तुम्ही कोणत्याही अडचणींवर मात कराल.
कधी कधी कठीण काळात कोणताच मार्ग दिसत नसतो. अशा स्थितीत मनात दुःख वाढत जाते आणि मन अस्वस्थ होते. सतत दुःखामुळे तणाव किंवा नैराश्य निर्माण होते. परंतु, भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे पालन करून तुम्ही स्वतःला तणावापासून दूर ठेवू शकता. श्रीमद भागवत गीता भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करते, जी श्रीकृष्णाने महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनला दिली होती. या शिकवणींद्वारे श्रीकृष्णाने माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग आणि पद्धत शिकवली आहे.
जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान गीतेत सापडते. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला संकटांनी किंवा कठीण परिस्थितीने वेढलेले दिसाल, तेव्हा गीतेच्या या शिकवणुकीचे स्मरण अवश्य करा. आज आम्ही तुम्हाला गीतेच्या अशाच काही अनमोल शिकवणींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे माणसाला तणावातून बाहेर पडायला मदत होते.
*काय आहेत ‘हे’ उपदेश?*
१- जर तुम्हाला जीवनात नैराश्यमुक्त आणि तणावमुक्त राहायचे असेल तर, सर्वप्रथम तुम्ही श्रीकृष्णाच्या या वचनांचे पालन केले पाहिजे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की, भविष्याची चिंता करणे व्यर्थ आहे आणि वर्तमानात जगणे हे सगळ्यात उत्तम आहे. काल आणि उद्याचा विचार करून काहीही साध्य होत नाही. यामुळे तुमचे मन तुमचे मन फक्त अस्वस्थ होत राहील. अशा स्थितीत एखादे चांगले काम करण्यावर भर द्या. यामुळे भविष्य आपोआपच चांगले होईल.
२- तुमचे मन तुमच्या दु:खाचे कारण आहे. अशा स्थितीत श्रीकृष्ण गीतेत सांगतात की, ज्या व्यक्तीने आपल्या मनावर ताबा ठेवला आहे, तो अनावश्यक चिंता आणि इच्छांपासून दूर राहतो. अशी व्यक्ती आपले ध्येय देखील सहज साध्य करते.
३- कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येकजण चुका करतो. अशा परिस्थितीत, आपल्या चुका आणि पराभवातून शिका आणि पुढे जा. त्यामुळे निराश होण्याऐवजी मन खंबीर करत राहा. असे केल्याने कोणतीही समस्या फार काळ टिकू शकणार नाही.
४- स्वतःची तुलना इतर कोणाशीही करू नका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, जे स्वतःची इतरांशी तुलना करतात, ते कधीही आनंदी होऊ शकत नाहीत. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा.
५- भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की, मनुष्याने भगवंतात लीन व्हावे. माणसाला देवाशिवाय कोणी नाही. त्याच बरोबर आपणही कोणाचेही नाही हे गृहीत धरून माणसाने आपले काम केले पाहिजे.