
दैनंदिन राशीभविष्यावरून रोजच्या घडामोडींचा अंदाज येतो. तर मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल हा आठवडा? जाणून घ्या आचार्य सरिता शर्मा यांच्या आजच्या साप्ताहिक राशीभविष्यात.
मेष (Aries) : या आठवड्यात प्रेमीजनांना चांगली बातमी मिळेल. त्यांच्या जुन्या प्रेमिकेची भेट होईल. वैवाहिक जीवनात मात्र समस्या वाढतील, ज्यांचे निराकरण करण्यासाठी आपणास वडिलधाऱ्यांशी चर्चेचा प्रयत्न करावा लागेल. आर्थिक बाबतीत सुद्धा आठवडा समस्याग्रस्त आहे. तेव्हा कोणाकडून उसने पैसे घेऊ नका तसेच कर्जासाठी अर्ज सुद्धा करू नका. व्यापाऱ्यांसाठी आठवडा आनंददायी आहे. व्यापारवृद्धीसाठी त्यांची नवीन लोकांशी ओळख होईल. त्यामुळं त्यांच्या प्राप्तीचे काही नवीन स्रोत सुद्धा वाढतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांना ज्ञान प्राप्तीची चांगली संधी मिळेल. आरोग्याच्या दृष्टीनं आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. समस्यांमुळं आपण तणावग्रस्त व्हाल आणि त्यामुळं आरोग्यावर ताण येईल.
वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा कष्टदायी आहे. या आठवड्यात त्यांना नाते टिकवून ठेवण्यासाठी आपला अहंकार बाजूस सारावा लागेल. विवाहितांना जोडीदारास समजून घ्यावे लागेल. असं न केल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्या वाढतील. आर्थिकदृष्ट्या आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. खर्चात वाढ झाल्यानं आपण त्रस्त व्हाल. कोर्ट-कचेरीशी संबंधित बाबी आपल्या खर्चात वाढ करतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित फळ न मिळाल्यानं ते त्रासून जातील. त्यामुळं ते एखाद्या चुकीच्या विषयाची निवड करण्याची संभावना आहे. या आठवड्यात शारीरिक समस्यांकडं आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. तेव्हा वेळ काढून आपल्या समस्यांकडं लक्ष द्यावं.
मिथुन (Gemini) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नाते संपुष्टात येऊ नये म्हणून प्रेमीजनांनी एकमेकांना समजून घ्यावं लागेल. या आठवड्यात कौटुंबिक समस्यांच्या प्रभावामुळं विवाहितांचे जीवन तणावग्रस्त राहील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्तम आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. प्राप्तीत वाढ करण्यावर आपले लक्ष राहील. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी समन्वय साधावा, अन्यथा वादाचे प्रसंग उदभवू शकतात. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या काही जुन्या योजनांना गती येईल. या आठवड्यात विद्यार्थी नवीन संशीधनात सहभागी होण्याचा प्रयत्न करतील. ते एखाद्या स्पर्धेत सुद्धा सहभागी होतील. ह्या आठवड्यात एखाद्या जुनाट आजारातून आपली सुटका होईल. परंतु जर आपणास एखादी आर्थिक समस्या असली तर त्याकडं आपण पूर्ण लक्ष द्यावं.
कर्क (Cancer) : हा आठवडा सुरूवातीस आनंद घेऊन येणारा आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा आनंददायी आहे. आपण प्रेमीकेसह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊन नाते अधिक दृढ कराल. विवाहितांना त्यांच्या जोडीदारास वेळ द्यावा लागेल. असं केल्यानं अनेक दिवसांपासून चालत आलेले वाद संपुष्टात येतील. आपण आपल्या पैश्यांची योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल, जी आपल्यासाठी लाभदायी ठरेल. शेअर्स बाजाराशी संबंधीत व्यक्ती चांगला पैसा कमवू शकतील. आपण आपली इच्छापूर्ती सुद्धा सहजपणे करू शकाल. हा आठवडा कारकिर्दीसाठी चांगला आहे. आपल्या मनात काही भ्रम असला तरी सुद्धा आपण प्रगती कराल. नोकरी करणाऱ्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. या आठवड्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित होण्यासाठी मित्रांपासून दूर राहणं उत्तम. आपण आपले विषय सुद्धा बदलू शकता. या आठवड्यात आपणास एखादा नेत्र विकार होण्याची शकता आहे. आहाराकडं दुर्लक्ष करू नये.
सिंह (Leo) : हा आठवडा विवाहितांसाठी आनंदाचा आहे. त्यांना आपल्या जोडीदाराकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या प्रेमिकेची भेट झाल्यानं प्रेमीजनांच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. आर्थिक बाबतीत आठवडा मिश्र फलदायी आहे. आपण एखाद्या व्यक्तीकडून उसने पैसे घेतले असल्यास त्याची परतफेड करण्यात समस्या निर्माण होईल. शेअर्स बाजाराशी संबंधीत व्यक्ती विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करतील. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी सध्या नोकरी बदलण्याचा विचार सोडून द्यावा. सध्याची नोकरी चालू ठेवणं त्यांच्या हिताचं होईल. मात्र आपण नवीन नोकरीसाठी अर्ज करू शकता. विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययनावर लक्ष केंद्रित करावं लागेल. आपला एखादा जुनाट आजार उफाळून येण्याची संभावना असून त्यानं आपण त्रस्त व्हाल. आपल्या दिनचर्येत योगासने आणि व्यायामास समाविष्ट करावे.
कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांच्या जीवनात प्रेमिकेमुळे काही तणाव निर्माण होईल. प्रेमिकेची अवस्था गोंधळाची असल्यानं नात्यात काही कटुता येऊ शकते. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. त्यांच्या नात्यातील दुरावा आता संपुष्टात येईल. या आठवड्यात आपल्या खर्चात वाढ झाल्यानं आपण निष्कारण त्रस्त व्हाल. एखादी संपत्ती खरेदी करण्याची आपली इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांनी दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज केला असल्यास त्यांना तेथून बोलावणं येऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी आठवडा पूर्वीपेक्षा चांगला आहे. त्यांना जीवनात शिस्त पाळावी लागेल. नवीन शिकण्यावर सुद्धा आपणास लक्ष केंद्रित करावं लागेल. हा आठवडा आरोग्यावरील ताण कमी करणारा आहे. एखादा जुनाट आजार उफाळून आला तर, तो उपचाराने बरा करण्यात आपण यशस्वी व्हाल.
तूळ (Libra) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण जेथे हात लावाल तेथून पैसे काढू शकाल. आपल्या कामाचं कौतुक होईल. प्रेमीजनांच्या आनंदात भर पडेल. वैवाहिक जीवनातील समस्यांमुळं आपल्या संततीकडं आपलं काहीसं दुर्लक्ष होईल आणि त्यामुळं ते त्रस्त होतील. नोकरी करणाऱ्यांना एखादे काम करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. त्यांची पदोन्नती संभवते. व्यावसायिकांच्या योजना त्यांना चांगला लाभ मिळवून देतील. मित्रांमुळं विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ शकते. आपणास जर एखादा विषय बदलावयाचा असेल तर वरिष्ठांचा सल्ला जरूर घ्यावा. आपली प्रकृती उत्तम राहण्यासाठी आपणास त्याकडं लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी आपला रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करून घ्यावी.
वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. कारकीर्दीस मात्र चांगला आहे. आपणास नवीन काहीतरी शिकावयास मिळेल. आपण एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक सुद्धा करू शकाल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास घेऊन जाऊ शकतील. तिच्या कार्यक्षेत्रात तिची प्रतिष्ठा वाढल्यानं आपण खुश व्हाल. वैवाहिक जीवनातील समस्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या मदतीनं सहजपणे दूर होऊ शकतील. आर्थिकदृष्ट्या आठवडा मिश्र फलदायी आहे. आपणास जर कोणाकडून उसने पैसे घ्यावयाचे असतील तर ते सहजपणे आपल्याला मिळू शकतील. आपण धन संचय करण्यात यशस्वी व्हाल. आपल्या प्रकृतीकडं आपण अजिबात दुर्लक्ष करू नये. अन्यथा आपल्या समस्या वाढून त्या गंभीर स्वरूप धारण करण्याची संभावना आहे.
धनु (Sagittarius) : हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. अभ्यासात सहभागी होऊन ते ज्ञानात भर घालतील. प्रणयी जीवनात एखाद्या समस्येमुळं आपल्यावर ताण येईल. त्याचा विपरीत परिणाम आपल्या कामावर सुद्धा होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात जर एखादे भांडण झाले असेल तर त्यांनी जोडीदाराशी चर्चा करून ते मिटविण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून हे भांडण घराबाहेर जाऊ शकणार नाही. आर्थिकबाबतीत हा आठवडा आपल्यासाठी ख़ुशी घेऊन येत आहे. आपलं नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्णत्वास जाईल. आपणास प्राप्तीचे नवीन काही स्रोत सुद्धा मिळतील. व्यावसायीकांची एखादी खंडित झालेली व्यवस्था ह्या आठवड्यात पुन्हा सुरु होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांशी समन्वय साधावा लागेल. आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपण आपली रक्त तपासणी करून घ्यावी. आपल्या दिनचर्येत योगासन आणि प्राणायाम याचा समावेश करावा.
मकर (Capricorn) : हा आठवडा आपल्यासाठी तणावग्रस्त राहील. ह्या आठवड्यात आपणास आरोग्यविषयक समस्या त्रास देतील. आपणास अशक्तपणा आल्यानं एखाद्या आजाराचं निदान होऊ शकेल. तेव्हा आपल्या तंदुरुस्तीकडं लक्ष द्यावं. प्रेमीजन आपल्या जुन्या प्रेमिकेच्या भेटीनं प्रसन्न होतील. परंतु त्यांना आपलं नातं टिकवून ठेवावं लागेल. विवाहितांच्या जीवनात आनंदाचं वातावरण राहील. आपली मुले सुद्धा त्यांचे नांव प्रसिद्ध करतील. आर्थिकबाबीत हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपली इच्छापूर्ती सहजपणे करू शकाल. व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात कोणाशीही भागीदारी करू नये. कारण त्यांचा डोळा आपल्या पैश्यांवर राहील. नोकरी करणाऱ्यांनी कोणाचं ऐकून आपली कामे करू नये. विद्यार्थ्यांचे अभ्यासात विशेष लक्ष लागणार नाही, याउलट इतर गोष्टीत त्यांचं मन रमेल.
कुंभ (Aquarius) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आरोग्यास हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. पोटाशी संबंधित विकार होण्याची संभावना असल्यानं आपणास आहारावर लक्ष ठेवावं लागेल. प्रेमीजनांना आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या कामावर होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात समस्या येतील ज्या चर्चा करून सहजपणे दूर होऊ शकतील. दोघेही एकमेकांना समजून घेतील. आर्थिकदृष्ट्या आठवडा मिश्र फलदायी राहील. ह्या आठवड्यात आपणास वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागेल. कोणत्याही योजनेत अतिरिक्त गुंतवणूक करू नये. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीमुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागण्याची संभावना आहे. व्यवसायात आपणास आपल्या योजनांचं आयोजन करावं लागेल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल, अन्यथा अभ्यासात समस्या येऊ शकतात. काही दिवसांसाठी आपण मित्रांपासून दूर राहावे.
मीन (Pisces) : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. वैवाहिक जीवनात भांडणे होतील जी सामंजस्य दाखवल्यास मिटू शकतील. परंतु आपल्या अहंकारामुळं समस्या वाढू शकतात. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. ते आपल्या प्रेमिकेशी रोमँटिक होतील. या आठवड्यात आपले खर्च वाढतील. बचत कमी होईल. आपण जेव्हा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यास जाल तेव्हा ती सुद्धा महागच मिळेल. व्यावसायिकांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांचा व्यवसाय प्रगती करेल. त्यांचं एखादं काम दीर्घ काळापासून थांबलं असेल तर ते आता पुन्हा सुरु होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल. शासकीय नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. विद्यार्थ्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहील. मात्र कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपणास त्यांची काळजी घ्यावी लागेल.