
रत्नागिरी- राष्ट्रीय स्पर्धेसाठी भुवनेश्वर येथे खेळायला गेलेली रत्नागिरीची जलतरणपटू निधी भिडे हिचा रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सत्कार करण्यात आला.
आतापर्यंत राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये अनेक पदके मिळवणारी इयत्ता ६ वी मध्ये शिकणारी फाटक प्रशालेची विद्यार्थिनी निधी भिडे हिला विजयदुर्ग येथे झालेल्या सांगरी जलतरण स्पर्धेत ५०० मीटरमध्ये पदक मिळाले रत्नागिरी जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत २ गोल्ड, २ सिल्वर आणि २ ब्रॉन्स पदक मिळवली. या सत्कार कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर, राजन सुर्वे, अभिजीत उर्फ मनू गुरव, नौसीन काजी, महिला तालुकाध्यक्षा शमीम नाईक, नेहाली नागवेकर, मुजफ्फर काजी, पंकज पुसाळकर, रणजीत शिर्के, मुनव्वर सुलताना फरहान मुल्ला आदी उपस्थितीत होते.