मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी? तर कोणते चेहरे दिसतील हे अद्याप नक्की झालेले नसले तरीही काही नावे नक्कीच मंत्रिमंडळात असणार आहेत.
प्रादेशिक समतोल, विविध समूहांना प्रतिनिधित्व देतानाही तीनही पक्षांतील महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपदाचा सन्मान मिळणार यात शंका नाही.
कोकणातून राणे आणि सामंत बंधू या निवडणुकीतून विधानसभेत प्रवेश करत आहेत. यातील नितेश राणे यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान देऊन केंद्रीय मंत्रिपदापासून दुरावलेल्या नारायण राणे कुटुंबाचे समाधान करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
मागील मंत्रिमंडळात उद्योग मंत्री म्हणून उत्तम कामगिरी करत आणखी काही आमदार निवडून आणणाऱ्या उदय सामंत यांच्या प्रमोशन ची अपेक्षा असल्याने महत्वाचे महसूल मंत्रिपद उदय सामंत यांना मिळण्याचे खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संकेत प्राप्त झाले आहेत.या मुळे येत्या मंत्रिमंडळात कोकण पट्ट्यात पुन्हा मानाची मंत्रिपदे येणार असल्याचे खात्रीलायक रित्या बोलले जात आहे.