
महाराष्ट्र : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दहाव्या दिवशी कुणाल थोरात (२-२३) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने पुणेरी बाप्पा संघावर डक वर्थ लुईस नियमानुसार ८ धावांनी विजय मिळवला.या विजयामुळे रत्नागिरी जेट्स संघाने ४ विजय, १ पराभव व ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.