रत्नागिरी जिल्हा “पोलीस शिपाई भरती -२०२१ लेखी परीक्षा”

Spread the love

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती सन – २०२१ मध्ये, पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक ०२/०४/२०२३ रोजी सकाळी ०८.३० वाजता, रत्नागिरी शहरातील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणार आहे.

या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी https://policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करण्यास दिनांक २९/०३/२०२३ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

लेखी परीक्षेकरीता, प्रवेशपत्र निर्गमित केलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राच्या प्रतिसह दिनांक ०२/०४/२०२३ रोजी सकाळी ठीक ०६.०० वा. उपस्थित राहावे.

लेखी परीक्षेबाबतच्या सविस्तर सुचना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे www.ratnagiripolice.co.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

उमेदवारांना काही अडचण/समस्या असल्यास त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष रत्नागिरी ०२३५२-२७१२५७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page