
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला गोवा शिपयार्डच्या सी.एस.आर मधून उपचार उपयोगी मशिनरी उपलब्ध करून देता आली याच समाधान लाखमोलाचे – ॲड.दीपक पटवर्धन
गोवा शिपयार्ड पब्लिक लिमिटेड गोवा या कंपनीच्या सी.एस.आर फंडातून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला डायलेसिस युनिटसाठी चार यूपीएस आणि अॅनेस्टेशिया मशीन मंजूर करून उपलब्ध करून देता आले यामुळे स्वतंत्र निर्देशक या पदी नियुक्ती झाल्याचे सार्थक वाटते. आज सिव्हील सर्जन श्रीमती डॉक्टर फुले मॅडम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच भा.ज.पा कार्यकर्त्याच्या उपस्थितीत या मशीनचे लोकार्पण करण्यात आले. रुपये १५ लाख किमतीची हि मशीनरी गोवा शिपाईड कंपनीने उपलब्ध करून दिली. अॅनेस्टेशिया चे हे मशीन रत्नागिरी रुग्णालयातल्या शस्त्रक्रियासाठी खूप उपयुक्त आहे असे डॉक्टर संघमित्रा फुले यांनी सांगितले. तसेच डायलेसिस युनिटची मशीन अद्यावत गरजेनुरूप सुरु रहावीत म्हणून गोवा शिपयार्डने दिलेले चार यूपीएस हेही अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहेत असे सांगत डॉक्टर फुले यांनी गोवा यूपीएस तसेच ॲड.दीपक पटवर्धन यांना धन्यवाद दिले.
गोवा शिपयार्ड कंपनी माध्यमातून युद्धनौका बनवण्याचे काम केले जाते. नेव्ही, कोस्ट गार्डसह अनेक शासकीय डिपार्टमेंटना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या बोटी तयार करण्याचे कामही कंपनी करते. देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी ही कंपनी काम करते अशा कंपनीच्या माध्यमातून काम करण्याची संधी भा.ज.पाच्या नेतृत्वाने ज्या विश्वासाने आपल्यावर सोपवली आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, पूर्ण कार्यक्षमतेने काम करण्यासाठी मी दृढ संकल्पित आहे असे सांगताना गोवा शिपयार्डचे स्वतंत्र निर्देशक, गोवा शिपयार्डच्या ऑडिट समितीचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन पुढे म्हणाले मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनुरूप गोवा शिपयार्ड चेअरमन ॲड.एम.डी.ब्रिजेशकुमार, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करीत आहे. या संरक्षण क्षेत्रातील कंपनीमध्ये निर्देशक म्हणून काम करण्याची संधी मिळणे हे माझ भाग्य समजतो असे ॲड.पटवर्धन म्हणाले व गोवा शिपयार्ड कंपनीचे अध्यक्ष व अन्य संचालक यांना ॲड.पटवर्धन यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयासाठी केलेल्या उपयुक्त योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आज जिल्हा रुग्णालयात झालेल्या छोटेखानी समारंभात हि मशिन्स जिल्हा रुग्णालयाला समर्पित करण्यात आली. त्याप्रसंगी भा.ज.पा शहर अध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, उमेश कुलकर्णी, नितीन जाधव, राजन पटवर्धन, श्री व सौ ढेकणे, बाबू सुर्वे, ॲड. निलेश आखाडे, श्री बेर्डे, सौ. सुप्रियाताई रसाळ, विक्रांत जैन, शहर अध्यक्ष सौ. आंबेरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिरात :
