जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी १, २०२३.
महाराष्ट्र मिनि ऑलिम्पिक पूणा क्लब, पुणे येथे झालेल्या स्क्वॅश या स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात ठाण्याची एशियन गेम्स रौप्य पदक विजेती उर्वशी जोशी (शिवछत्रपती पुरस्कार) व नामांकीत माॅस्को स्क्वॅश ओपन स्पर्धेत रौप्य पदक विजेता राहूल बैठा यांच्या बरोबर झालेल्या अंतिम सामन्यात रत्नागिरीचा कु.क्रिश संदीप कलकुटकी व कु. सेजल सुनिल कदम यांनी रौप्य पदक पटकावले.
रत्नागिरी जिल्हा स्क्वॅश पुरुष संघाचे प्रशिक्षक मनिष काणेकर व रत्नागिरी जिल्हा स्क्वॅश महिला संघाचे प्रशिक्षक श्री.भरत कररा, रत्नागिरी जिल्हा स्क्वॅश संघाचे व्यवस्थापक श्री. प्रविणकुमार आवळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनचे महासचिव श्री. नामदेव शिरगावकर आणि ठाणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट असोशिएशनचे सचिव श्री. यज्ञेश्वर बागराव सर तसेच रत्नागिरी जिल्हा स्क्वॅश रॅकेट असोशिएशनचे सचिव श्री. भरत कररा, रत्नागिरी जिल्हा स्क्वॅश संघटना अध्यक्ष विजय उतेकर, तसेच उपाध्यक्ष संजय सुर्वे, विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, सहकोषाध्यक्ष शशांक घडशी, संतोष सुर्वे, सुनिल शिंदे, रोहित शिंदे या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.