
रत्नागिरी : २७जानेवारी रोजी मांडवी रोड येथील “घरकुल अपार्टमेंट” मधील एका घराच्या दरवाजाचा, एका अज्ञात इसमाद्वारे कडी व कोयंडा तोडून, एकूण २६ तोळे सोने व ₹३००००/- रोख रक्कम चोरण्यात आली होती.
या घरफोडी च्या अनुषंगाने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं. २२/२०२३ भा.द.वि.स.क. ४५४ व ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकामार्फत निरंतर तपास चालू असताना गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करण्यात आला.

या गुन्ह्यामध्ये एका संशयित महिलेसह एका इसमास फिर्यादी यांचे राहते घराच्या दरवाजाची कडी व कोयंडा तोडून घरात प्रवेश करून बेड-रुम मधील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून नेल्याचे पोलीस तपासात सांगितल्याने त्यांना दिनांक २५/०३/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपीत यांचेकडे गुन्हयातील चोरी केलेले दागिन्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीत यांनी गुन्हयातील चोरी केलेले दागिने शेजारील जिल्ह्यातील साथीदाराच्या मदतीने एका सोनाराकडे विक्री केल्याचे सांगितले वरुन दिनांक २७/०३/२०२३ रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकातील तपास पथकाने शेजारील जिल्ह्यात जाऊन गुन्हयातील आरोपीत क्रमांक ३ याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही परंतु आरोपीतांनी गुन्हयातील चोरीस गेलेले दागिने विक्री केलेल्या सोनाराचे दुकान दाखविले असता या सोनाराचे दुकानातून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले.
या गुन्ह्यातील एकूण चोरीस गेलेले विविध सोन्याचे दागिने व ₹३०,०००/- रोख असे एकूण ₹८,३००००/- (आठ लाख तीस हजार) किंमतीचा १००% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.दोन्ही आरोपीत यांना मा. न्यायालयाने दि. २६/०३/२०२३ रोजी पासून पुढे ०७ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे. तसेच या महिलेच्या, (शेजारील जिल्ह्यामधील) अन्य एका साथीदाराचा शोध सुरू आहे तसेच गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.

ही कारवाई रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोउनि/आकाश साळुंखे,पोहेकाँ/ प्रसाद घोसाळे, . पोहेकाँ/प्रविण बर्गे, पोहेकाँ/अमोल भोसले, पोना/संकेत महाडीक,पोना/ मनोज लिंगायत,पोना/आशिष भालेकर,पोना/ पंकज पडेलकर व पोना/विनय मनवल या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता व अज्ञात चोरटयाचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री. विनित चौधरी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री. आकाश साळुंखे व पोलीस अंमलदार यांना मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्फत प्राप्त सूचनांच्या आधारे अधिक मार्गदर्शन केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६