श्रीकृष्ण खातू /धामणी- डेरवणच्या श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर जिल्हा परिषद रत्नागिरीच्या प्राथमिक शाळांच्या जिल्हा स्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा मान.शिक्षणाधिकारी श्री.बी.एम्.कासार,श्री.किरण लोहार, शिक्षणाधिकारी (योजना), उपशिक्षणाधिकारी श्रीमती शिरभाते मॅडम, SVJCT चे क्रीडांगण मुख्य व्यवस्थापक मान.श्रीकांत पराडकर सर,चिपळूण ग.शि.अ. श्री.दादासाहेब इरनाक साहेब,खेड गशिअ श्री. बाईत साहेब,मंडणगड गशिअ श्री.नंदलाल शिंदे साहेब, गुहागर गशिअ श्री. गळवे साहेब, जिल्हा क्रीडा व्यवस्थापक तथा कॉमनपूल विस्तार अधिकारी श्री.संदेश कडव साहेब, चिपळूण तालुक्यातील विस्तार अधिकारी तथा क्रीडा सहव्यवस्थापक श्री.राजअहमद देसाई साहेब,श्रीमती सशाली मोहिते मॅडम, श्रीमती अस्माकौसर देसाई मॅडम, श्रीमती मानसी शिंदे, श्रीमती सौरवी जाधव मॅडम, खेड विस्तार अधिकारी श्री.श्रीधर शिगवण, सर्व शिक्षक संघटनांचे राज्य,कोकण प्रांत,जिल्हा पदाधिकारी ,श्री.विकास नलावडे,श्री.चिंतामणी गायकवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन,प्रतिमा पूजनाने उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ झाला. खोखो पंच प्रमुख श्री.अरविंद भंडारी, कबड्डी पंच श्री.मुरलीधर वारे यांनी मोठा गट मुलगे संघनायकांच्या सहयोगाने क्रीडा ज्योत आणली. SVJCT क्रीडांगण मुख्य व्यवस्थापक श्री.श्रीकांत पराडकर यांच्या हाती ज्योत सोपवली. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तिची स्थापना झाली. यानंतर मान.शिक्षणाधिकारी श्री.कासार साहेबांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहन पार पडले.याचे संचलन शिक्षक श्री.मुरलीधर वारे यांनी केले.तद्नंतर शाळा सावर्डे कासारवाडीच्या विद्यार्थ्यांनी सर्व श्री शरद नेटके आणि सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराईतपणे पाहुण्यांना दिलेली सलामी कौतुकास्पद होती. संपूर्ण क्रीडानगरीच्या उद्घाटनाचे श्रीफळ मान.किरण लोहार यांच्या शुभहस्ते वाढवून मान्यवरांचे आगमन व्यासपीठावर झाले.
मान.प्रमुख पाहुणे,उद्घाटक,मान्यवर, क्रीडा प्रेमी,सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी,सर्व तालुक्यांचे मान.गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आदींचे यथोचित सन्मान व स्वागत झाले. प्रमुख पाहुणे मान.पराडकर सरांनी गत सहा वर्षांपासून या क्रीडानगरीत जिप आपल्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेऊन SVJCT च्या उद्देश पूर्तीसाठी सहयोग देत असल्याबदृदल विशेष धन्यवाद दिले आणि यापुढेही संस्थेकडून सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. मान.शिक्षणाधिकारी शुभेच्छा देताना म्हणाले की, खेड्यापाड्यात शिकणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी खेळाडुंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा प्रबोधिनीत खेळायला मिळणं ही मोठी भाग्याची बाब आहे. शिक्षकांनी आणि संघटनांनी दिलेलं महत्त्वपूर्ण सहकार्य या स्पर्धा यशस्वी करतात,ही बाब प्रशासनासाठी भूषण आहे. क्रीडास्पर्धांप्रयाणेच विद्यार्थी सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिप ने अनेक स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले आहे.यातही आपल्या विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश मिळविण्यासाठी सर्व शिक्षकांनी योगदान देऊन राज्यात आपला जिल्हा अव्वल करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. अशा शब्दांत शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना शुभेच्छा व्यक्त केल्या.
क्रीडा स्पर्धांसाठी अमूल्य योगदान देणारे श्री सतीश सावर्डेकर क्रीडा सहसमन्वय तसेच सर्व समित्यांचे सर्व व्यवस्थापक, सदस्य आदींच्या पाठीवर कौतुकाची थाप, सर्व क्रीडा प्रमुखांना पदभार ,क्रीडा शपथ आदी समायोजित कार्यक्रमांनी हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.चिपळूण गटशिक्षणाधिकारी मान.श्री.इरनाक साहेबांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
मध्यंतरापूर्वी जिप चे मु.का. अधिकारी मान.कीर्तीकुमार पुजारी व पंचायत समिती , चिपळूण च्या गट विकास अधिकारी श्रीम उमा घारगे पाटील मॅडम यांचे आगमन झाले.शिक्षणाधिकारी श्री.कासार साहेबांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.मान.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्य व्यासपीठावरुन थेट मैदान गाठण्यासाठी लगबग केली. सर्वच मैदानांवर जाऊन स्वतः क्रिकेटच्या खेळाचा आनंद ही लुटला तसेच सर्व खेळाडू,पंच,शिक्षक,क्रीडारसिकांना प्रोत्साहित केलं. त्यांच्या हस्ते वैयक्तिक क्रीडा प्रकारांत अव्वल आलेल्या खेळाडुंना प्रशस्तीपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. व्यासपिठावरून संबोधताना ते म्हणाले की,खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. खेळामुळे फक्त शारीरिक सुदृढताच नाही तर सर्वांगीण गुणवत्ता अंगी बाणण्यासाठी खूप मदत होते.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे साहेबांनी कौतुक केले.
सर्व विद्यार्थी खेळाडू,पंच,संघ व्यवस्थापक ,शिक्षक यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
विजेत्या ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले जनरल चँपियन शिल्ड संगमेश्वर तालुक्याने पटकावली. बक्षिस वितरणाने कार्यक्रमाची सांगता करणेत आली.
कार्यक्रमाप्रसंगी रेखाटलेली रांगोळी सर्वांचेच आकर्षण ठरली.स्पर्धेतील प्रशासकीय कामकाजासाठी मा.अधीक्षक श्री.नलावडे,लिपिक सौ.घावत,सौ.सुळे,श्री. झगडे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रभावी सूत्रसंचालन प्रकाश(आशू) गांधी प्रविण सावंत व संदीप शिंदे यांनी केले.