सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती.
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी यांची जिल्हा कार्य करण्याची बैठक काल दिनांक 11 जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
भारतीय जनता पार्टी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागली असून भाजपच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. जिल्हा कार्यकारणीची बैठक नुकतीच संपन्न झाली, या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीसाठी संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी कार्य अहवाल सादर करत भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेले आजपर्यंतचे विविध कार्यक्रम बुथ स्तरावरील रचना याबतात माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पाहिला गेला याचाही उल्लेख त्यांनी आवर्जून केला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्ते कामाला लागले असून या मतदारसंघांमध्ये आपलाच खासदार विजयी होईल हा विश्वास देखील व्यक्त केला व स्थानिक युतीच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ग्रामीण बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एक पाऊल मागे घेईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा “इसबार चारशे पार” हे उद्देश पूर्ण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत युतीचा खासदार या मतदारसंघात विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.
रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब माने यांनी देखील बोलताना कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले ‘नमो चषक’ साठी जास्तीत जास्त खेळाडूंना स्पर्धकांना सहभागी करून घ्या याबाबत सूचना केल्या.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांनी आपले विचार व्यक्त करताना शत: प्रतिशत भाजपा यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. मोदींच्या लाभदायक योजना ही आपली ताकद आहे. संगठन वाढीसाठी होत असलेले काम कौतुकास्पद आहे. होत असलेले पक्षप्रवेश यामुळे भाजपची ताकद वाढत आहे. मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक लोक जोडले जात आहेत. भारतीय जनता पार्टी म्हणून जोरदार कामाला लागा अशा सूचना करण्यात आल्या. या बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण, लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रमोदजी जठार, महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब माने, शैलेंद्रजी दळवी, बाबासाहेब परुळेकर उल्का विश्वासराव, प्रमोद अधटराव, शिल्पाताई मराठे सर्व मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.