प्रमुख अतिथी चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ, प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी लक्षणीय संख्येने उपस्थित!
देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत सोनवडे येथे आज केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियानांतर्गत ‘आमचा संकल्प विकसित भारत’ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भारतीय जनता पार्टी संगमेश्वर (दक्षिण) तालुक्याचे पंचायत राज सेल संयोजक श्री. देवदत्त भाट्ये यांनी केले.
रथयात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारने राष्ट्रगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या त्रिसूत्रीवर आधारित केलेल्या कामगिरीचा आढावा घेणारी चित्रफित यावेळी उपस्थितांना पहावयास मिळाली. याबाबत मनोगत व्यक्त करताना प्रमोद अधटराव म्हणाले, “मा. मोदीजी आणि त्यांच्या सरकारच्या माध्यमातून देशात पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास झाला आहे. शिक्षण, शेती, अर्थ, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत भारताने प्रगती केली आहे. कोकण याबाबतीत काहीसे मागे असले तरीही विकसित भारताचा एक महत्त्वपूर्ण भाग होण्याची संधी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला मिळणार आहे. भाजपाच्या माध्यमातून तुमच्या पुढे येणाऱ्या उमेदवाराला जनतेने भरघोस आशीर्वाद दिल्यानंतर कोकणात आमुलाग्र स्थित्यंतर होण्यास प्रारंभ होईल.”
या कार्यक्रमासाठी भाजपा संगमेश्वर (दक्षिण) ता. सरचिटणीस यशवंत गोपाळ, सोशल मिडिया जिल्हा संयोजक अमोल गायकर, क्रीडा सेल तालुका उपाध्यक्ष शेखर गुरव, सरपंच अंकुश राऊत, उपसरपंच संदीप गुरव, ग्रा. पं. सदस्य प्रिया आंब्रे, संजीवनी गेल्ये, संजय खेडेकर, पोलीस पाटील अनंत जोशी, कृषी सहाय्यक भोसले साहेब, विस्तार अधिकारी गिरी साहेब, आरोग्य अधिकारी डॉ. धने, तलाठी साळुंखे मॅडम, ग्रामसेविका तृप्ती मोहिरे, आशा सेविका सौ. देवयानी चव्हाण, अंगणवाडी सेविका सौ. प्राजक्ता कुष्टे, माध्यमिक विद्यालय सोनवडे येथील शिक्षक मयूर तांबे, प्रतिष्ठित नागरिक योगेश शिंदे, अनंत डाफळे, प्रकाश गुरव, विष्णू चव्हाण, गजानन झगडे, सुरेश भोसले, सदानंद सनगरे, विजय कांबळे यांच्यासह शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.