
भंडारा | महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील तीन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार झाला नसून, त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. एका टीव्ही चॅनलने ताज्या फॉरेन्सिक अहवालाचा हवाला देत हा खुलासा केला आहे.
फॉरेन्सिक तज्ज्ञांचा हा अहवाल शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांशी जुळत नाही. पोस्टमार्टम अहवालात अल्पवयीन बहिणींवर आधी बलात्कार आणि नंतर हत्या करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार, तिन्ही बहिणींची हत्या केल्यानंतर त्यांना विहिरीत फेकून दिले होते.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी गावातील पाच, नऊ आणि अकरा वर्षांच्या तीन बहिणी बेपत्ता होत्या. त्या शाळेतून परतल्या नाहीत, तेव्हा त्यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.
बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर दोन दिवसांनी गावकऱ्यांना मुरमाडी गावाजवळील विहिरीतून तिन्ही बहिणींचे मृतदेह सापडले. यानंतर पोलिसांनी तिन्ही बहिणींच्या मृत्यूची ‘अपघात’ अंतर्गत नोंद केली.
गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी खून, अपहरण, बलात्कार अशा गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केला.