संगमेश्वर :- दिनेश अंब्रे- संगमेश्वर येथील रामपेठ अंगणवाडी बाल दिनाचे औचित्य साधून तेथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन लक्ष्मण शिरगावकर तसेच नावडी येथील व्यावसायिक संजय रेडीज यांनी सचित्रवही व रंगभरण साहित्य व फळ वाटप केले.
मान्यवर श्री. जनार्दन शिरगावकर व संजय रेडीज यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे यांनी केले.
मुलांचे आवडते चाचा नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा होतो त्यानिमित्त पल्लवी शेरे यांनी प्रास्ताविकात माहिती सांगितली. नावडी येथील सौ. रुचिता राहुल घोडके तसेच ओंकार अंब्रे यांनी बालकांना खाऊ वाटप केले. श्री शिरगावकर व श्री. रेडीज यांनी गुलाब पुष्प देऊन मुलांना सन्मानित केले.
जनार्दन शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त करताना रामपेठ अंगणवाडी ने आज पर्यंत केलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा केली.
यावेळी पालक वर्ग व मुले उपस्थित होती. सौ. शितल दिनेश अंब्रे (मदतनीस )यांनी आभार मानले.