⏩राजापुर : प्रतिनिधी
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील लांजा तालुक्यातील मुंबईस्थित शिवसैनिकांच्या संवाद अभियान बैठक शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी लांजा तालुक्यातील पालू गावामधील राजू कांबळे ह्यांनी काँग्रेस पक्षातून (शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
⏩त्याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम, संगमेश्वर तालुका संपर्कप्रमुख राजेश शेलार, राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भुवड, युवासेना मुंबई समन्वयक अथर्व साळवी, लांजा सह संपर्कप्रमुख रमेश आग्रे, मुंबई तालुकाप्रमुख शंकर मांडवकर, सह संपर्कप्रमुख शशिकांत सावंत, विभाग संपर्कप्रमुख मनोहर लांबोर, दादर माजी शाखाप्रमुख प्रवीण शेट्ये, सहकार लांजा तालुका संपर्कप्रमुख सुधीर मोरे, वाकेड विभाग संपर्कप्रमुख सुभाष तांबे, सरपंच कोंडये मनोज चंदूरकर, राजापूर युवाधिकारी संदेश मिठारी, विलास पाथरे व मान्यवर उपस्थित होते.