मुंबई शहरातील तीन रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे. डिसेंबर २०२३ अखेर सर्व स्थानकांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील ५०८ रेल्वे Station अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेच्या माध्यमातून विकास केला जात आहे. त्यामध्ये म.रे च्या मुंब्रा, दिवा, शहाड आणि टिटवाळा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून या स्थानकांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. या योजनेतून प्रत्येक स्थानकाच्या विकासासाठी सुमारे २० कोटी निधी मिळणार आहे. पुढील एका वर्षामध्ये या स्थानकांचा विकास पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांपैकी मुंब्रा, दिवा, शहाड आणि टिटवाळा या रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची सातत्याने मागणी केली जात असली तरी त्यांना आवश्यक निधी मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अमृत भारत रेल्वे स्थानक योजना सुरू करण्यात आली असून रविवार ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच ठिकाणाहून ऑनलाइन पद्धतीने सर्व स्थानकांच्या कामांचे भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
जाहिरात