राजिवली शिर्केवाडी सह तीन गावातील नळपाणी पुरवठा योजना संशयाच्या भोव-यात
संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राजिवली, कुटगिरी व रातांबी या तीन गावांसाठी स्वतंत्र नळपाणी राजिवली घाडगेवाडी साठी नविन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र येथील ग्रामस्थांसाठी अद्याप विहीरच खोदलेली नाही त्यामुळे विहीर न खोदताच टाकलेल्या पाईपलाईन चे करायचे काय असा प्रश्न ग्रामस्थ विचारु लागले आहेत.
जिल्हा प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा…
नळपाणी पुरवठा विभागाकडून राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तीन गावांना पाणी पुरवठा करणा-या आणि मुबलक पाणी उपलब्ध करुन देणा-या विहिरींचे नियोजन आधी करणे आवश्यक असताना
विहीरींची पाणी पातळी लक्षात न घेतांच पाईपलाईन टाकण्याची घाई केल्याने योजनेचा बट्ट्याबोळ होवून शासनाचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात घालवण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. या विषयी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग रत्नागिरी यांनी वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज असून यापुढील शासनाचा अनावश्यक खर्च वाचवून ग्रामस्थांना पाणी मिळेल याचे नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पुरवठा योजना मंजुर करण्यात आल्या असून या तीन गावातीलजनतेला पाणी मिळावे म्हणून तब्बल तीन कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र येथील कामाचे नियोजन आणि भूजल सर्वेक्षणामुळे विहीरींची चुकलेली जागा यामुळे येथील योजनेचे
तीन तेरा वाजले आहेत.
योजना संशयाच्या भौऱ्यात….
राजिवली शिर्केवाडी येथील नळपाणी पुरवठा योजना करताना जिल्हा परीषद भूजल विभागाने सूचवेल्या विहीरीच्या ठिकाणी विहीर खोदण्यात आली मात्र त्या ठिकाणी पाणीच लागले नाही त्यामुळे शासनाचा खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे. तर विहीर खोदण्यापुर्वीच पाईपलाईन टाकल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजिवली शिर्केवाडी येथील ग्रामस्थांची पाण्याची गरज लक्षात घेता हाती घेतलेले नळपाणी पुरवठा योजनेचे काम नियोजना अभावी बारगळत असून काम संशयाच्या भोव-यात सापडले आहे.रातांबी येथील नळपाणी पुरवठा योजनेबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून येथील स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेताच विहिरीचे काम केल्याने येथील ग्रामस्थांनी आपली या कामी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी सदर योजनेची पाहणी करावी…
तीन गावातील ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून येथील ग्रामस्थांसाठी नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या होत्या मात्र नियोजना अभावी येथील योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून येथील कामाची जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी आता स्थानिक करु लागले आहेत.
विहीर पडल्यानंतर पाणी ची लाईन करणे गरजेचे असताना अगोदर का केले?
मात्र येथील ग्रामस्थासाठी अद्याप विहीरच खोदलेली नाही त्यामुळे विहीर न खोदताच टाकलेल्या पाईपलाईन चे करायचे काय असा प्रश्न ग्रामस्थ विचारु लागले आहेत.
नळपाणी पुरवठा विभागाकडून राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तीन गावांना पाणी पुरवठा करणा-या आणि मुबलक पाणी उपलब्ध करुन देणा-या विहिरींचे नियोजन आधी करणे आवश्यक असताना विहीरींची पाणी पातळी लक्षात न घेतांच पाईपलाईन टाकण्याची घाई केल्याने योजनेचा बट्ट्याबोळ होवून शासनाचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात घालवण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. या विषयी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग रत्नागिरी यांनी वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज असून यापुढील शासनाचा अनावश्यक खर्च वाचवून ग्रामस्थांना पाणी मिळेल याचे नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.