
संगमेश्वर : अर्चिता कोकाटे/ नावडी- तालुक्यातील श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळये हायस्कूल व जूनियर कॉलेज कोळंबेच्या श्री राजेंद्र खांबे ( शिक्षक ) यांची महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे
राजेंद्र खांबे हे शिक्षक कम्प्युटर तज्ञ, स्काऊट मास्तर, प्रसन्न व्यक्तिमत्व, पर्यावरणात बंधारे व सामाजिक कार्यात अग्रेसर, सदैव कामात तत्पर व हसतमुख व्यक्तिमत्व तसेच शिस्तप्रिय व अभ्यासू म्हणून ओळख आहे.
कोळंबे प्रशालेत गेली अठ्ठावीस वर्ष हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
2004 पासून त्यांनी हिंदीच्या प्रचार व प्रसाराचे काम सुरू केले होते. संगमेश्वर तालुक्यात व रत्नागिरी जिल्ह्यात हिंदी विषयासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे. याआधी ते जिल्ह्याच्या मंडळावर कार्याध्यक्ष होते. स्काऊट गाईड म्हणून 1999 पासून कार्य करताना अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे. कोळंबे प्रशाला तर्फे अभिनंदन करण्यात आले तसेच जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
माझी राज्याध्यक्ष श्री. अनिल कुमार जोशी, जिल्हाध्यक्ष मिलिंद कडवईकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत खेडेकर यांनी त्यांचे राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.