पंजाबने राजस्थान रॉयल्सचा ५ विकेट्सने पराभव केला. राजस्थानचा हा सलग चौथा पराभव आहे. पंजाबचा कर्णधार सॅम करणच्या अष्टपैलू खेळीने पंजाबने राजस्थानचा लो स्कोरिंग सामन्यात पराभव केला.
राजस्थान रॉयल्सला पंजाब किंग्सने पाच विकेट राखून हरवले…
राजस्थानचा हा सलग चौथा पराभव आहे. या पराभवानंतरही राजस्थान १६ अंक मिळवून अंकतालिकेत दुसऱ्या नंबरवर कायम आहे. राजस्थान प्लेऑफमध्ये आधीच क्वॉलीफाय झाले आहे. मात्र अव्वल दोनमध्ये येण्यासाठी कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर) विरुद्ध होणाऱा सामना जिंकावा लागेल. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच केकेआर तालिकेत अव्वल राहून साखळी सामन्याचा टप्पा पूर्ण करणार आहे.
आज पंजाबविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या ३४ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने केलेल्या ४८ धावांच्या बळावर २० षटकात ९ बाद १४४ धावा केल्या होत्या. पंजाबकडून कर्णधार सॅम करन, हर्षल पटेल आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. १४५ धावांचे आव्हानाच्या पाठलाग करताना पंजाबने सॅम करनच्या ४१ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद ६३ धावांच्या बळावर ७ चेंडू व ५ विकेट राखून विजय मिळवला. पंजाबकडून आशुतोष शर्मा ११ चेंडूत १७ धावा करून नाबाद राहिला. राजस्थानकडून आवेश खान आणि युजवेंद्र चहल यांनी २ -२ विकेट घेतल्या.
अंकतालिकेत दुसऱ्या स्थानावर राजस्थान…
राजस्थानने १३ सामन्यात आठ विजय व ५ पराभवासह १६ अंक मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. तर पंजाबने १३ सामन्यात ५ विजय व ८ पराभवासह नवव्या स्थानावर आहे. राजस्थानचा शेवटचा साखळी सामना अंकतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) बरोबर आहे. तर पंजाबचा सामना सनरायजर्स हैदराबादशी आहे.
पंजाबचा कर्णधार सॅम करनने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत २ विकेट घेत राजस्थानला सुरुवातीला धक्के दिले. त्यानंतर पंजाबची फलंदाजी गडबडल्यानंतर अर्धशतकी खेळी करून पंजाबला विजय मिळवून दिला.
पंजाबचा कर्णधार सॅम करन आणि उपकर्णधार जितेश शर्मा यांनी ६३ धावांची भागीदारी करत पंजाबचा डाव सावरला. जितेश शर्माने २२ धावांचे योगदान दिले. सॅम करनने त्यानंतर आशुतोष शर्माने नाबाद १७ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पहिल्या पाच षटकातच पंजाबचे चार आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर सामना राजस्थानच्या बाजुने झुकला होता. मात्र सॅम करनने कर्णधाराला साजेशी खेळी करत ६३ धावांची खेळी करत सामना फुरवला. सॅम करनला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.