राष्ट्रीयत्व अन् हिंदुत्व; आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “गेली ९९ वर्ष संघाने…”…

Spread the love

संघाच्या स्थापनेला ९९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघाबाबत मोठे वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज ९९ वर्ष पूर्ण झाले असून या संघटनेने १०० व्या वर्षात पदार्पण केलं आहे.राष्ट्रीय स्वंयसेवक संघानेशंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. आज १२ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने विजयादशमी उत्सव साजरा केला. संघाच्या स्थापनेला ९९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला शुभेच्छा दिल्या आहेत

विजयादशमी संचलनाला नागपुरात भरपावसात स्वयंसेवकांनी सोहळ्याला हजेरी लावली. संघाच्या सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शतकोत्तर वर्षात पदार्पण केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पोस्ट केली आहे.

राज ठाकरेंनी काय केलीय पोस्ट?…

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन. ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केलं. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन.भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे.

संघाचं काम मला अचंबित करतं -राज ठाकरे..

संघाचं काम मला कायमच अचंबित करतं. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो,हे मी अनेकदा पाहिलं आहे. संघातील बर्‍याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे.देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे.

मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही. जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना १०० वर्ष टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल. ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं राज ठाकरेंनी म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page