नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या संमेलनासाठी उपस्थिती लावली आहे. यावेळी समोरच्या व्यक्तीशी मराठीतच बोला असे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले.त्याचबरोबर राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी, अशी विनंती सरकारला तसेच मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर केली आहे.
कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजधानीत जेव्हा मराठी भाषेऐवजी हिंदी एकू येते तेव्हा त्रास होतो. भाषेला आमचा विरोध नाही मात्र हिंदीही आपली राष्ट्र भाषा नाही. मराठी, तामीळ भाषांप्रमाणे हिंदी उत्तम भाषा, पण ती आपली राष्ट्र भाषा नव्हे असे म्हणत पंतप्रधानांना जर आपल्या गुजरात विषयी प्रमे असेल तर आपण मराठी लोक का मागे आहोत, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये १० वी पर्यंत मराठी भाषेची सक्ती करावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.