राज ठाकरेंची मोठी खेळी! विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत उमेदवारांची नावे जाहीर…

Spread the love

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आहे. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे जवळपास 250 जागा लढवणार आहे. इतकचं नाही तर मुंबईतील सांभाव्य उमेदवारांची नावे देखील मनसेने जाहीर केली आहेत.

विधानसभा निवडणूकीत मनसे स्वबळावर निवडणुक लढवणार आहे. राज्यभरात 225 ते 250 जागा मनसे लढवणार आहे. संभाव्य उमेदवारांना आपल्या मतदार संघात कामाला लागण्याचे सांगण्यात आले आहे.

कोकण, ठाणे पुणे तसेच कोकणातील खेड-दापोली-मंडणगड विधानसभा जागेसाठी वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शैलेश बिडवे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबई विधानसभा मतदारसंघातून गजानन काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात साईनाथ बाबर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

राज ठाकरे एक ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यालाही सुरुवात करणार आहेत… त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या दौ-याला विशेष महत्त्व असणार आहे.. निवडून येणा-यांनाच तिकीट देणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय.. त्यामुळे आता मनसेचं इंजिन महायुतीच्या गाडीवर वेगळं होणार का.. आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार का याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.. कारण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंना महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता.. तसंच लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या.. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुण्यात राज ठाकरेंच्या जाहीर सभा झाल्या… त्या जागांवर महायुतीचे उमेदवारही निवडून आले. त्यामुळे राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला तारल्याची चर्चा रंगली होती… मात्र विधानसभा निवडणुकीधी राज ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केलीय.

मुंबईतील 36 पैकी 16 संभाव्य उमेदवारांची यादी

शिवडी – बाळा नांदगावकर
भायखळा – संजय नाईक
वरळी – संदीप देशपांडे
माहीम – नितीन सरदेसाई
चेंबूर – माऊली थोरवे
घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
विक्रोळी – विश्वजित ढोलम
मुलुंड – सत्यवान दळवी/राजेश चव्हाण
भांडुप – शिरीष सावंत/योगेश सावंत/संदीप जळगावकर/अतिषा माजगावकर
कलिना – संदीप हटगी/संजय तुरडे
चांदिवली – महेंद्र भानुशाली
जोगेश्वरी – शालिनी ठाकरे
दिंडोशी – भास्कर परब
गोरेगाव – वीरेंद्र जाधव
वर्सोवा – संदेश देसाई
मागाठणे – नयन कदम

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page