आजपासून दोन दिवस राज ठाकरे कोकण दौऱ्यावर

Spread the love

चिपळूण : – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे आज गुरूवारपासून कोकण दौऱ्यावर येत असून पक्ष बांधणी व भेटी गाठी घेऊन हा दौरा ते करणार आहेत .
आज १३ जुलै रोजी स .१० वा . पुण्याहून ते चिपळूणला येणार असून १०.३० वा . मार्कंडी याठिकाणी पक्ष कार्यालय उद्घाटन केल्यावर हॉटेल अतिथीमध्ये जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेणार आहेत . नंतर खेड येथे वैश्य भवन हॉलमध्ये सायं . ६ वा . पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे . १४ जुलै रोजी स .१० वा . दापोली येथे पक्ष कार्यालय उद्घाटन करून स . ११.३० वा . मंडणगड येथील पदाधिकारी बैठक होणार आहे . राज ठाकरे हे कोकण दौऱ्यात दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का ? यावर मोठे विधान करण्याची शक्यता असून त्यांच्या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page