
केळशी , ता. दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत केळशी येथे इंद्रधनू गटाने विविध कृषी विषयांवर प्रात्यक्षिक करून दाखवली.
केळशी त झालेल्या या कार्यक्रमाला महिला बचतगटाचे सदस्य उपस्थित होते. कृषी प्रात्यक्षिकांमध्ये दुधापासून बासुंदी, रसगुल्ला तसेच श्रीखंड कसे बनवायचे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात महिलांनी उस्फूर्त सहभाग दाखवला.

या उपक्रमाचे उद्दिष्ट महिला बचतगटांच्या सदस्यांना लघुउद्योगांना चालना देणे व शाश्वत शेतीतील महत्त्वाच्या बाबी समजावून देणे तसेच त्यातून व्यवसायाच्या संधी निर्माण करणे हे होते. या कार्यक्रमाला एकूण 20 महिलांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी डॉ. प्रसादे यांचे मार्गदर्शन लाभले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर