
केळशी, दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे शिकणार्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि सप्ताह साजरा केला. शेतकर्यांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात शेती बाबत जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या उपक्रमात आदिती बेर्डे , साक्षी चव्हाण, दिक्षा चव्हाण, साक्षी धनवटे ,हिरल आलीमकर , स्नेहल बेंदगुडे ,शर्वरी भोसले , साक्षी आढाव ,सानिका डांगे, युगा देसाई या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले गेले होते. या मध्ये मुलींनी सर्वप्रथम शेतकर्यांना गिरीपुष्पा च्या पाल्याचे शेतीमध्ये महत्व सांगितले. त्याच बरोबर कोकण जलकुंड कसा तयार करावा व त्याच्या मदतीने पाण्याचे संकलन कसे करावे हे शेतकर्यांना पटवून देण्यात आले.
1 जुलै रोजी कृषि दिनानिमित्त जि.प. प्राथमिक केंद्र शाळा केळशी नं.1 च्या विद्यार्थ्यांसोबत कृषि दिंडी काढण्यात आली आणि पुढील दिवसात विविध स्पर्धा राबविण्यात गेल्या होत्या. त्यामध्ये निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा , विविध पानांचे व फुलांचे नमूने ओळखणे अश्या स्पर्धांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग दाखवला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप तळदेवकर तसेच इतर शिक्षकांनी देखील उपक्रमामध्ये विद्यार्थिनींना खूप चांगले सहकार्य केले. या कार्यक्रमाचा शेवट स्पर्धेमध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन करण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शेती विषयी आत्मीयता निर्माण झाली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*