माझ्या हातात सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा लाऊ देणार नाही:अमरावतीच्या सभेत राज ठाकरेंनी दिला शब्द, उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा…

Spread the love

*अमरावती-* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमरावती विधानसभेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अमरावती येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना, माझ्या हाती सत्ता द्या एकाही मशिदीवर भोंगा लाऊ देणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, धर्मांध मुसलमानांच्या धांगडधिंग्याच्या विरोधात आवाज उठवणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मी आवाज दिला आणि ते बंद करून घेतले. हे केले म्हणून माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर 17000 केसेस टाकल्या, आणि त्यावेळेस सरकार कोणाचे होते तर उद्धव ठाकरे-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच. माहीममध्ये एक मझार होती ती अनधिकृत होती, ती आम्ही पाडायला लावली. माझा आज तुम्हाला शब्द देतो, माझ्या हाती सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा लाऊ देणार नाही.

*हिंदू का विखुरलेले?…*

आपण मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून कधी विचार करणार आहोत का नाही? हिंदू फक्त दंगलीत एकत्र असतो बाकीच्या वेळेस तो हिंदू नसतो. आणि हेच बाहेरच्यांना हवं आहे. मी एक क्लिप पाहिली आज, एक मुसलमान मौलवी मशिदीतून फतवा काढतो की काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक गठ्ठा मतदान करा असे फतवे निघत आहेत. लोकसभेला पण हेच घडले. मग हिंदू का विखुरलेले? असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

*उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती केली…*

उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती केल्यावर स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाच्या मागची ‘हिंदुहृदय’ सम्राट ही उपाधी काढली. इम्तियाज जलीलने हजारो मुसलमानांचा मोर्चा मुंबईत आणला, ही हिंमत का झाली ? कारण काँग्रेस-शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस- उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आलेत. नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी रस्त्यावर उतरून बीभत्स आंनद व्यक्त केला. मागे एकदा अमरावतीत दंगल झाली तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विश्व हिंदू परिषद यांनी दंगेखोर मुसलमानांना सडकून काढले होते. कितीवेळ बाहेर उभे राहून करायचे, माझ्या हाती सत्ता द्या, एकेकाला चांगला सडकून काढेल, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

*शरद पवार नामक संताने महाराष्ट्रात जातीजातीत विष पेरले…*

हिंदू एकत्र येऊ नये म्हणून शरद पवार नामक संताने महाराष्ट्रात जातीजातीत विष पेरले. जेम्स लेन प्रकरणात महाराजांच्याबद्दल काही वेडीवाकडी वाक्य होती, ते पुस्तक कोणी वाचले होते? त्यावर बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहंदळे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या मजकुरावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पवारांनी भांडारकर संस्थेवर आरोप करवून घेतला की या संस्थेनेच म्हणे ही चुकीची माहीती दिली. पुढे बाबासाहेब पुरंदरेंवर आरोप करून शरद पवारांनी आधी ब्राह्मण-मराठा वाद भडकवला आणि पुढे मराठा-ओबीसी वाद पेटवला. तुम्ही मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून एकत्र येऊ नये ही पवारांची इच्छा आहे.

*अमरावतीमध्ये आले की घरी आल्यासारखे वाटते..*

अमरावतीच्या आठवणीबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, अमरावतीला आले की मला घरी आल्यासारखे वाटते. 1989 साली प्रत्यक्ष राजकारणात आलो, जन्म राजकीय घरात झाला होता. पुढे राजकीय व्यंगचित्रकार झालो आणि 1989 साली विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाला. 1993 साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांचा मोर्चा काढला होता. 1989 ते 1995 हा काळ माझा मराठवाडा आणि विदर्भात गेला. त्यातल्या त्यात विदर्भात सगळ्यात जास्त काळ अमरावतीत राहिलो. 1988-89 ला माझे मित्र विजय राऊत यांच्या घरी जात असे. तेव्हाच अमरावती सुंदर होते. माझ्या आजीचे माहेर अमरावती. अमरावतींबद्दल मला पहिल्यापासून एक आस्था आहे. पण आज हे शहर जसे आकारहीन होत गेलं ते पाहून वाईट वाटते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page