पंजाब किंग्सचा रोमहर्षक विजय; गुजरात टायटन्सच्या तोंडचा घास हिरावला; पंजाबचा शशांक सिंग ठरला विजयाचा हिरो…

Spread the love

अहमदाबाद- पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात ३ विकेट्सनी रोमहर्षक विजय मिळवला आहे. पंजाबने गुजरातचे 200 धावांचे आव्हान 19.5 षटकात 7 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. शशांक सिंगने 29 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. त्याला आशुतोष शर्माने 17 चेंडूत 31 धावा ठोकत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

गुजरात टायटन्सने आज पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 199 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने दमदार फलंदाजी करत 48 चेंडू नाबाद 89 धावांची खेळी केली. तर स्लॉग ओव्हरमध्ये राहुल तेवतियाने तडाखेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत 8 चेंडूत नाबाद 23 धावा चोपल्या. यामुळे गुजरात पंजाबसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवू शकला. साई सुदर्शनने देखील 19 चेंडूत 33 धावा करत चांगला हातभार लावला. पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेत गुजरात टायटन्सला फलंदाजी आमंत्रण दिलं. गुजरातच्या संघाने २० षटकाअखेर १९९ धावा केल्या. गुजरातने दिलेलं आव्हान पंजाबचा सिंह ठरलेल्या शंशाकने सहजगत्या पार केलं.

शशांक सिंगच्या खेळीपुढे शुभमन गिलची नाबाद ८९ धावांची खेळी फेल ठरली. पंजाबला 6 चेंडूत विजयासाठी 7 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर नाळकांडेने आशुतोष शर्माला बाद केलं. त्याने 17 चेंडूत 31 धावा केल्या. दुसरा चेंडू नाळकांडेने बाऊन्सर टाकला. मात्र तो हरप्रीत ब्रारच्या डोक्यावरून गेल्याने एक वाईडची धाव मिळाली. मात्र गुजरातने रिव्ह्यू घेतला अन् तिसऱ्या अंपायरने चेंडू वैध ठरला. चार चेंडूत 6 धावांची गरज असताना नाळकांडेने तिसऱ्या चेंडूवर एक धाव झाली. तीन चेंडूत 5 धावा हव्या असताना त्यानंतर ब्रारने चौथ्या चेंडूवर चौकार मारत गुजरातच्या सामना 2 चेंडूत 1 धाव असा आणला. 2 चेंडूत 1 धावांची गरज असताना शशांक सिंगने एक धाव घेत सामना जिंकून दिला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page