मुंबई : राज्यात फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उन्हाच्या झळा सहन करण्याची वेळ आली आहे. दिवसा उन्हाच्या झळा तर रात्री थंडी अशी अवस्था राज्यातील काही जिल्ह्यांची झाली आहे.दरम्यान पुणे, मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यात उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. मागच्या दोन दिवसांपासून कोकण आणि पुणे परिसरात पारा 35 अंशांवर जाऊन पोहोचल्याचा अंदाज आहे. याचबरोबर मागच्या 24 तासांत सोलापूर जिल्ह्यात 37 तर कोल्हापूर जिल्ह्यात 35 अंशांची नोंद झाली. तर पुणे आणि मुंबई या दोन मुख्य शहरांचाही पारा 35 पर्यंत गेला आहे. दरम्यान याचा परिणाम नागरिकांच्या थेट आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईकरांना दोन दिवसांपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबईत मागच्या 24 तासांत कमाल तापमान 36 अंशांवर गेले होते. महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
जाहिरात :