
कोकणच्या फुलांबद्दल देवधरांकडून गौरवोदगार …
निसर्ग दर्शन करणारे उत्तम पुस्तक….
संगमेश्वर l 21 फेब्रुवारी- कोकणच्या सुंदर निसर्गातील विविध फुलं, हा आपल्या लेखनाचा विषय करुन कोकणचे लेखक जे. डी. पराडकर यांचे चपराक प्रकाशनच्या घनश्याम पाटील यांनी तयार केलेले ऋतुरंग हे पुस्तक सर्वांगसुंदर असे झालं असून, वाचक या पुस्तकाचे भरभरून स्वागत करतील असा विश्वास भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव, सध्या आंध्र प्रदेशचे सहप्रभारी असलेल्या सुनील देवधर यांनी व्यक्त केला.
चपराक प्रकाशन पुणे तर्फे कोकणचे लेखक जे. डी. पराडकर यांच्या कोकण वरील सलग आठव्या पुस्तकाचे प्रकाशन आज सुनील देवधर यांच्या हस्ते चपराक प्रकाशनच्या ग्रंथदालनात करण्यात आले. यावेळी चपराकचे संपादक घनश्याम पाटील, ऑनलाईन संपादक ज्योती पाटील, लेखिका चंद्रलेखा बेलसरे, गोरख दगडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना देवधर पुढे म्हणाले की,कोकणातील या सुंदर फुलांचे पुस्तकं पूर्णपणे रंगीत छापून चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी या फुलांना आणि पराडकर यांच्या लेखनाला योग्य न्याय दिला असल्याचे देवधर यांनी स्पष्ट केले. केवळ कोकण या एकाच विषयावर एकाच लेखकाची सलग आठ पुस्तकं प्रकाशित करणं हा कोकणचा एक गौरव असल्याचे देवधर यांनी सांगितले.
▪️वाचाकांना गंध देणारी फुलं !
कोकणचा निसर्ग केवळ पर्यटकनांच भुरळ घालतो असं नव्हे, तर तो कवी आणि लेखकांना देखील खुणावत असतो. लेखक जे. डी. पराडकर यांनी खूप बाराकाईने या फुलांचे निरीक्षण करुन केलेले लेखन या रंगीत पुस्तकातून वाचाकांना नक्कीच गंध देईल असा विश्वास आहे.
– घनश्याम पाटील संपादक चपराक, पुणे