ठाणे : कोकणातील गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन
ठेपला असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ची
अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने त्यातच कोकणातील
जनता व कोकणातील पत्रकार संघटना मुंबई-गोवा राष्ट्रीय
महामार्गासाठी रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याने त्याची
धास्ती घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
पुन्हा एकदा पनवेल ते झाराप पर्यंत पाहणी दौरा करीत आहेत.
कोकणातील चाकरमान्यांचा गणेशोत्सव हा एक महिन्यावर
येऊन ठेपला असून १९ सप्टेंबरपासून कोकणात गणेशोत्सवाला
प्रारंभ होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणारे
चाकरमानी हे मुंबई, गुजरात, ठाणे, पुणे, कल्याण, अंबरनाथ,
बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी व मुंबईतील उपनगरासह वसई,
विरार, मिरा रोड, भाईंदर, नालासोपारा, डहाणूपासून लाखोंच्या
संख्येने कोकणात गणेशोत्सवासाठी मिळेल त्या वाहनाने जात
असतात. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या
जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून हजारो
एसटी बसेस तसेच खाजगी वाहने जातात. १९ सप्टेंबरपासून
गणेशोत्सवाला प्रारंभ होत असला तरी कोकणातील चाकरमानी
हे गणेशोत्सवापूर्वी आठ दिवस अगोदर आपापल्या गावी जात
असल्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर मोठ्या
प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात