रत्नागिरी- रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभिकरण करणे या कामाचा लोकार्पण सोहळा उद्या बुधवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे, आमदार प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, डॉ. राजन साळवी, भास्कर जाधव, योगेश कदम, शेखर निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मनिषा पाटणकर-म्हैसकर, सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य सदाशिव साळुंखे, सचिव (बांधकामे) सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य संजय दशपुते, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे कार्पोरेशन संतोष कुमार झा, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण शरद राजभोज, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.