
वाकेड ते परशुराम घाट पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार.
रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (सार्वजनिक उपक्रम वगळून) हे जिल्हा दौऱ्यावर येत असून ते मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

▶️बुधवार 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 ते 3 वाजता पॅकेज 8 तळगाव ते वाकेड या 35 किमी ची पाहणी.
▶️ दुपारी 3 ते 3.45 वाजता पॅकेज 7 वाकेड ते कांटे या 51 किमी ची पाहणी.
▶️दुपारी 3.45 ते 4.30 वाजता पॅकेज 6 कांटे ते आरवली या 40 किमी ची पाहणी.
▶️दुपारी 4.30 ते सांयकाळी 5 वाजता पॅकेज 5 आरवली ते चिपळूण या 25 किमी ची पाहणी.
▶️सांयकाळी 5 ते 5.30 वाजता चिपळूण ते परशुराम घाट पाहणी या 11.40 किमी ची पाहणी.
▶️सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजता पॅकेज 4 परशुराम घाट ते कशेडी घाट 42.30 किमी ची पाहणी.
▶️सांयकाळी 6.30 ते 7 वाजता पॅकेज 3 कशेडी घाट ते भोगाव खुर्द या 13 किमी ची पाहणी.