मुंबई- शंभूतीर्थ संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त दि. ११ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची कोकण विभाग नियोजन बैठक भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री विक्रांत पाटील, भाजपा महाराष्ट्र चिटणीस श्री प्रमोद जठार व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहूल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी ११ मार्च रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व शिवप्रेमी युवक एकत्रित येणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने धोक्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यापासून ते महाराजांच्या बलिदानापर्यंत चा इतिहास युवकांपर्यंत पोहोचावा त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच परंतु “धर्मवीर” देखील होते, काही लोक (मविआ) संभाजी राजांच्या धर्मनिष्ठ असण्यावर शंका घेत आहेत ही बाब आजच्या युवकांसमोर मांडणे या कार्यक्रमातून अपेक्षित आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान कायम स्मरणात राहावे, येणाऱ्या पिढ्यांना या धर्मनिष्ठ इतिहासाची कायम प्रेरणा मिळत राहावी यासाठी शंभूतीर्थ संगमेश्वर या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाइस उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार आहे…
महाराष्ट्रातील अधिकाधिक शिवशंभू प्रेमींनी ११ मार्च २०२३ रोजी शंभूतीर्थ संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन देखील भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर यांनी सदरील बैठकीत केले. या बैठकीला भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश महामंत्री निखिल चव्हाण यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महामंत्री यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…