

कोकण (शांताराम गुडेकर )
“बळीराज सेना” या पक्षाची
प्रथम जाहीर सभा पक्ष बांधणीसाठी गुहागर शृंगारतळीयेथे पार पडली. तालुक्यातील गोर -गरीब कष्टकरी आणि सर्व सामन्याच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या “बळीराज सेनेची प्रथम सभा गुहागर तालुक़ा ग्रामीण अध्यक्ष सन्मा.हुमणे गुरुजी यांच्या अध्यक्षतेख़ाली पक्षाध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाख़ाली संघाअध्यक्ष भूषण बरे,संघ सरचिटणीस अरविंद डाफळे ,बळीराज सेना उपाध्यक्ष सुरेश भायजे, सरचिटणीस नंदकुमार मोहिते,संभाजी काजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोज़ीत करण्यात आली होती.
या सभेसाठी मुंबईवरुण ख़ास बळीराज सेना सचिव मनोज पवार, उपनेते , अँड चंद्रकांत कोबनाक, दत्ताराम घोंगले, रमेश कानावले,गुहागर तालुक़ा (मुंबई )अध्यक्ष कृष्णा वणे, माज़ी नगराध्यक्ष राजेश बेंडल, कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे,रत्नागिरी उत्तर जिल्हा अध्यक्ष मधुकर सोलकर, रत्नागिरी दक्षिण युवा अध्यक्ष प्रथमेश गावणकर,रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष – सखाराम माळी,बळीराज सेना पदाधिकारी- मनोहर पवार, दत्ताराम मांडवकर, शांताराम जाधव, प्रभाकर धनावड़े, राजाराम ढोलम, प्रकाश चांदीवड़े, अनिल मोंडे, बबन कांबले , विष्णु खापरे, किंजले, तन्मय टक्के , घाणेकर, कलभाटे,गुहागर शाखा मुंबई / ग्रामीण पदाधिकारी , गुहागर बाज़ार पदाधिकारी आणि हजोरो समाजबंधु – भगिनींच्या / युवांच्या उपस्थितीत प्रथम प्रचार सभा संपन्न झाली.
या सभेमध्ये युवा अध्यक्ष प्रथमेश गावणकर,राजाराम ढोलम,नंदकुमार मोहिते , माधव कांबळे,संभाजी काजरेकर,सुरेश भायजे,अरविंद डाफ़ळे,संघाध्यक्ष भूषण बरे यांची समायोजित मार्गदर्शनपर भाषणे झाली.
पक्षाध्यक्ष अशोक दादा वालम साहेब यांनी चौफ़ेर टोळेबाजी करीत उपस्थितांची मने जिंकली.यामध्ये प्रामुख्याने सभागृहात उपस्थित केलेल्या काही प्रमुख मागणी बाबत आवश्यकते मागणी अर्ज़ संघाकड़े अथवा बळीराज सेनेकड़े सादर करावे असे निर्देशित केले गेले.प्रास्ताविकामधे विषद केलेल्या अनेक मुद्द्यावर पक्षाध्यक्ष यांनी सविस्तर खुलाशेवार माहिती दिली.बळीराज सेना पक्ष का आणि कश्यासाठी यावर सविस्तर माहिती दिली.राज्यातील कष्टकरी- शेतकरी – शेतमजूर, बहुजन वर्ग – दिनदुबले , बाराबलुतेदार- अठरा अलुतेदार यांच्या न्याय हक्कासाठी ही बलाढय बळीराज सेना काम करणार आहे. यासाठी सर्वानी एक होऊन आज पासून काम करुया आणि येणा-या २०२४ च्या राजसत्तेत आपण किंगमेकर होऊया हा माझा शब्द नसून माझा वचन नामा आहे. कारण जे मी बोलतो ते करुण दाखवीतो ! असा माझा स्वभाव व आजपर्यंतच कर्तृत्व आहे.शेवटी सभाध्यक्ष सन्मा. हुमणे गुरुजी यांनी अध्यक्षीय मनोगतात असे सांगीतले की अश्या ध्येयवादी विचारसरणीवर आम्हीही विस्वास ठेऊन तुमच्या सोबत आज पासून जोडत आहोत आणि कार्य सुरू करत आहोत. सभेचे प्रास्ताविक सन्माः- कृष्णा वणे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार संघ माज़ी सरचिटणीस पांडुरंग पाते यांनी केले.